शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

शाळेसाठी तुम्ही काय केलं?; शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘ग्लाेबल टिचर’ डिसले गुरूजींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:05 AM

शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविली कामाची फाईल

- राजकुमार साराेळेसोलापूर : परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी अमेरिकेत पीएच.डी. मिळविण्यासाठी रजेची परवानगी मागितल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी डिसेंबर २१ मध्ये दिलेला अर्ज गेल्या दीड महिन्यांपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे.रणजित डिसले हे गुरुवारी जिल्हा परिषदेत आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची त्यांनी भेट घेऊन परदेशात डॉक्टरेट करण्यासाठी अध्ययन रजेची परवानगी मागितली. त्यावर स्वामी यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला. डिसले यांनी लोहार यांची भेट घेऊन रजेसाठी विनंती अर्ज दिला. त्यावर डॉ. लोहार यांनी डॉक्टरकीसाठीचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही परदेशात गेल्यावर शाळेचे काय करणार? असा सवाल उपस्थित केला. इतके दिवस रजा शक्य नाही. त्यामुळे अर्जासोबत यासाठी पर्याय तुम्हीच सुचवा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे डिसले यांना अर्ज भरून आणण्यासाठी गावी परतावे लागले आहे.डिसले गुरुजी बाहेर पडल्यानंतर डॉ. लोहार पत्रकारांसमोर म्हणाले की, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचाविण्यासाठी डिसले यांनी नेमके काय केले? गेल्या तीन वर्षांत त्यांनी शाळेसाठी नेमके काय केले, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यास सांगितले आहे. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब अभिमानास्पद आहे; पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला, हे तपासावे लागणार आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणारे नाही.शासनाच्या ‘डाएट’ योजनेंतर्गत मी दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर विशेष शिक्षक म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ‘आयटी’ विषय शिकवत होतो. शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी मी सहा महिने अमेरिकेत चाललो आहे. दीड महिन्यांपूर्वी रजेचा अर्ज दिला आहे. त्याला आजपर्यंत का मंजुरी मिळाली नाही, हे मला माहीत नाही.         - रणजित डिसले गुरुजी, बार्शी

टॅग्स :Ranjitsinh Disaleरणजितसिंह डिसले