शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांचं काय चुकलंय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:01 IST

नियोजनबद्ध पद्धतीने आपण स्वच्छ असल्याचे सप्रमाण पुरावे लोकांच्या मनापर्यंत पोहचविणे आणि आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे, हाच राजमार्ग ! हाच मार्ग अजितदादांचा भविष्यातील राजकीय प्रवास सुखावह बनवू शकतो, हे कोण नाकारणार ?

विश्लेषण : राजा माने

अजितदादा अश्रू रोखू शकले नाहीत...दादांच्या अश्रूंनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं मन हेलावले...राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना तर अक्षरशः भरुन आलं ! उभा महाराष्ट्र धीरगंभीर झाला...आणि मग...दादांच्या बाबतीत असं का घडतंय ? हा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य माणसाला कमालीचा त्रास देवू लागला...अनेकजण राजकारणाच्यापलीकडे जावून प्रश्नाकडे पाहू लागले. आत एक आणि बाहेर दुसरेच दाखविणारी प्रवृत्ती सहन न करणारे, शिस्तीचे व कोणत्याही कामातील सर्वोत्कृष्ठतेचे भोक्ते, कोणत्याही कामातील अचूकता आणि नीटनेटकेपणाविषयी सदैव आग्रही असणारे, स्पष्टवक्ते, प्रसंगी फटकळ बनणारे "रोखठोक दादा" नेहमीच अनेकांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा विषय राहिले आहेत. कणखर, धाडसी आणि बिनधास्त या गुणांची संपदा लाभलेले दादा अचानक अस्वस्थ, बेचैन होतात व त्यांच्या स्वभावास अनुसरुन आमदारकीचा राजीनामा देतात. आणि काही काळासाठी अज्ञातवासात निघून जातात...पुन्हा तुमच्या-आमच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालू लागतो..दादांच्या बाबतीत असं का घडलं,का घडतं ?

जी चूक काकांची तीच दादांची...त्याच प्रश्नाचं उत्तर शोधताना इतिहासातील संदर्भांच्या उतरांड्या उतरविणे अपरिहार्य ठरते. नवमहाराष्ट्राच्या निर्मिती नंतर पहिलं दशक सोडलं तर १९७०च्या दशकापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीत, समाजकारण-राजकारणात शरद पवार हे नाव सदैव अग्रभागी राहिले. शरद पवारांच्या राजकीय भूमिकांबद्दल अनेकांची वेगवेगळी मते आहेत पण त्यांच्या अष्टपैलू, प्रगल्भ, पुरोगामी आणि लोकाभिमुख विधायक दृष्टिकोनाबद्दल कुणाचेही दुमत असू शकत नाही. किंबहुना देशातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते शरद पवारांचा आदर करीत आले आहेत. पण १९९०च्या दशकात ते अनेक आरोपांसाठी टारगेट केले गेले. भाजपचे नेते गोपीनाथराव मुंढे यांनी भ्रष्टाचारापासून दाऊद संबंधापर्यंतचे अनेक आरोप करीत त्यावेळी राज्यभर यात्रा काढली. महाराष्ट्र ढवळून काढला. खैरनार सारखे अधिकारी तर पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे देण्याची भाषा करीत राहिले. आरोपांची राळ उठविली गेली. त्या आरोपांमुळे पवारांविषयी जनमानस कलुषित झालं. परिणामी १९९५ साली भाजप-शिवसेनेने महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकविला! पवारांच्या विरोधातील आरोपांनी कलुषित झालेले महाराष्ट्राचे मानस बदलण्याचा, आरोपांचे वेळोवेळी खंडन करुन सर्वसामान्य माणसाचे मन स्वच्छ करण्याचा शिस्तबद्ध आणि ठोस प्रयत्न स्वतः पवारांनी, त्यांच्या निष्ठवंत नेत्यांच्या फळीने अथवा काँग्रेस पक्षानेही कधी केलाच नाही. त्या आरोपांमुळे शरद पवार लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही, त्यांच्या बद्दल आदर असूनही सर्वसामान्य माणसाच्या मनात पवारांविषयी सदैव संभ्रम व संशयाचेच वातावरण राहिले. पुढे ते आरोप हास्यास्पद होते हे सिद्ध झाले, हे महाराष्ट्र जाणतो. पण "कर नाही तर डर कशाला?" या म्हणीला घट्ट मिठी मारण्याची व आरोपांना गांभीर्याने न घेता दुर्लक्ष करण्याची किंमत मात्र शरद पवारांना मोजावी लागली. महाराष्ट्राची अचूक नस पकडणाऱ्या पवारांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबतीत महाराष्ट्राला गृहित धरण्याची चूक केली. नेमकी तीच चूक अजितदादा गेल्या १०-१५ वर्षांपासून करीत आहेत. राज्याचे कारभारी तुम्ही होता, मग घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीची जबाबदारी ही आपोआपच कारभाऱ्यावर येते. त्यातून समाज काही मते बनवीत असेल तर ते चूक की बरोबर, ही जबाबदारी कोणाची ? आरोपांकडे दुर्लक्ष करणे, नेहमीच योग्य नसते. त्या चुकीची जाणीव त्यांना का होवू नये ?

हत्ती आणि सुईचे छिद्र...अजितदादांचा राजकारणातील प्रवेश हा शरद पवार परिवाराच्या एकहाती सत्तेच्या काळात झाला. आज अस्तित्वात आलेला सहकार कायदा त्यावेळी नव्हता."सहकारात सुईच्या छिद्रातून हत्तीही जातो",असे सहकार क्षेत्रातील अनेक दिगग्ज गमतीने व कौतुकाने सांगायचे, असा तो काळ! कायद्याने जनहिताचे काम होत नसेल तर ते कामच कायद्यात बसविण्याला लोकमान्यता असायची! त्याच कारणाने कुणाच्याही बाबतीत  आरोप करायला वाव मिळतो. विरोधक म्हणून त्याचा फायदा का घेवू नये ? सिंचन घोटाळ्याच्या आरोपापासून अजितदादांच्या बाबतीत तेच घडत आले आहे. आज अजितदादा पाटबंधारे खात्याचे बजेट तरी सत्तर हजार कोटी रुपयांचे होते का ? शिखर बँकेत ठेवी ११-१२ हजार कोटींच्या असताना  घोटाळा २५ हजार कोटींचा कसा होवू शकतो का ? असे सवाल करताहेत. सिंचन असो वा शिखर बँक घोटाळा, होणाऱ्या आरोपांची गांभीर्याने दखल घेवून जे जे मुद्दे ते आज सांगताहेत ते त्या त्यावेळी लोकांसमोर आणले असते तर आजची वेळ आली असती का ? वर्षांनुवर्षे हजारो कोटींचे आरोप होत राहतात स्वतः अजितदादा, राष्ट्रवादी पक्ष अथवा त्यांचे तथाकथित समर्थक पेटून उठून आरोप खोडून काढताहेत किंवा आरोप करणाऱ्यांच्या विरोधात त्यांनी अब्रु नुकसानीचे खटले दाखल करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे चित्र महाराष्ट्राला कधीही पहायला मिळाले नाही. या उलट दादा आणि मंडळी सत्ताकारणात मश्गुल राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आरोप सिद्ध झाला तरच आरोपी गुन्हेगार ठरतो ! आरोप सिद्धतेच्या प्रक्रियेपर्यंत आरोप समाज मन कलुषित करुन संशयाचे वातावरण निर्माण करतात, हे वास्तव २०१४ च्या सत्ता परिवर्तनानंतर तरी अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांनी जाणायला हवे होते. नेमके तसे घडले नाही आणि अजितदादांवर आजचा बाका प्रसंग ओढवला ! अजूनही बाजी पूर्णपणे हातातून गेलेली नाही. नियोजनबद्ध पद्धतीने आपण स्वच्छ असल्याचे सप्रमाण पुरावे लोकांच्या मनापर्यंत पोहचविणे आणि आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे, हाच राजमार्ग ! हाच मार्ग अजितदादांचा भविष्यातील राजकीय प्रवास सुखावह बनवू शकतो, हे कोण नाकारणार ?(लेखक लोकमतचे राजकीय संपादक आहेत)