शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पडल्यावर जागे होऊन काय उपयोग?

By admin | Updated: September 4, 2015 00:59 IST

पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हे दरवर्षीप्रमाणे प्रभावित झाले आहेत़ यंदा त्याचा फटका इतर जिल्ह्णांनाही बसण्याची चिन्हे आहेत़

मुंबई: पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हे दरवर्षीप्रमाणे प्रभावित झाले आहेत़ यंदा त्याचा फटका इतर जिल्ह्णांनाही बसण्याची चिन्हे आहेत़ अशा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय नियोजन केले? याचा खुलासा राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रावर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी दिले़राज्यावर ओढावलेल्या दुष्काळी स्थितीबाबत न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली़ न्यायालय म्हणाले, की पाऊस कमी झाल्याने सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती बघता, सिंचनासाठी राज्य शासनाने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे़ त्यात दुष्काळ तोंडावर आला की सरकार नियोजनाच्या तयारीला लागते़ हे गैर आहे़ मुळात शासनाने यासाठी ठोस नियोजन करायला हवे, ऐनवेळी जागे होऊन तत्परता दाखवू नये़आधीच गेली काही वर्षे राज्यात पाऊस कमी होत आहे़ असाच पुढील तीन-चार वर्षेही पाऊसच झाला नाही तर सरकार काय करणार? यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाण्याचे नियोजन करताना अत्यंत काळजी घ्यायला हवी, असे खडेबोलही न्यायालयाने यावेळी सुनावले़उजनी धरणाचे पाणी मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यांना सोडावे, अशी मागणी करणारी याचिका सोलापूर येथील शेतकरी सिद्धेश्वर वरडे यांनी केली आहे़ त्यावरील सुनावणीत न्यायालयाने शासनाला वरील आदेश दिले़ त्यानुसार शासनाला येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच, ८ सप्टेंबरपर्यंत दुष्काळाच्या नियोजनाचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे़ तसेच न्यायालयाने जलसंपत्ती प्राधिकरणाला याचिकाकर्त्यांच्या मागणीचाही विचार करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)