शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
3
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
4
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
5
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
6
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
7
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
8
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
9
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
10
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
11
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
12
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
13
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
14
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
15
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
16
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
17
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
18
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
19
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
20
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल

"देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले", रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 17:46 IST

Rohit Pawar : लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. 

सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बार्शीमध्ये शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन राज्य सरकारला घेरले. तसेच, महायुतीवर निशाणा साधला. या शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. 

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते, पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे. त्यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडलं, पक्ष फोडले, तुकाराम महाराजांच्याबद्दल बोललं गेलं, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचं राज्य सुरु आहे, अशा स्थितीत तुम्ही शांत बसता. मग तुमचं हेच कर्तृत्व का? असा सवाल करत लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. 

याचबरोबर, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळं शेतकऱ्यांचं पाच हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं. मात्र, त्यावर राज्यातले नेते काहीही बोलत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले की केंद्र सरकारनं कांद्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता, पण खरं तर अजित पवार हे सत्तेत आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते, अशी टीका रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली.

"लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाहीत"लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीचे बादशाह आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचे आहे की, शरद पवार हे भटकती आत्मा नाहीत, तर इथं असलेल्या सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची, स्वाभिमानी लोकांची पवारसाहेब आत्मा आहेत, असं रोहित पवार म्हणाले. तसंच, आमचा महाराष्ट्र आमचा स्वाभिमानी आहे. त्यामुळं तुम्ही कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं सांगत रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस