शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

BJP vs NCP, Aurangzeb: "सम्राट संबोधणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे औरंगजेबाशी नेमकं नातं काय?"; भाजपाचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:35 IST

प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांनी खुलासा करण्याची केली मागणी

BJP vs NCP, Aurangzeb: औंरगाबाद शहराचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्रातील सरकारने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आता लवकरच दैनंदिन वापरातून औरंगाबाद हे नाव वगळून नवे नाव येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण मुघल राजा औरंगजेब याला सम्राट संबोधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगजेबाशी नेमके काय नाते आहे? याचा जाहीर खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करावा, असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मानवतेचा क्रूर हत्यारा औरंगजेबचा उल्लेख "सम्राट" असा करणे म्हणजे त्या पक्षात औरंगजेब कुणाचा नातेवाईक आहे का..? पक्षाने आता 'औरंगजेब राष्ट्रवादी पक्ष' असे नामकरण करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले असून औरंगजेबाच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली त्यात उल्लेख करताना सम्राट औरंगजेब असा उल्लेख केल्याने केवळ मतासाठी लांगूलचालन किती करावे हा राष्ट्रवादी पक्षाचा लाळघोटेपणा उघडकीस आला. औरंगजेब हा राष्ट्रवादी पक्षासाठी आदर्श असून पक्षातील कोणाचा नातेवाईक आहे का..? कारण, त्यांच्या दृष्टीने औरंगजेब हा सम्राट असेल पण, याच औरंगजेबाने आमचे आदर्श छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस बंदिस्त व हाल-हाल करून क्रूरपणे मारून टाकले मग तो आमच्यासाठी सम्राट कसा काय होऊ शकतो?" असा सवाल त्यांनी केला.

तसेच, "मध्यंतरी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही औरंगजेबाबाबत गौरवोद्गार काढले होते हे कसे विसरता येईल, आमच्या दृष्टीने औरंगजेब हा मानवतेचा हत्यारा असून तो सम्राट होऊच शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना औरंगजेब आपला आदर्श वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नांव देखील "औरंगजेब राष्ट्रवादी पक्ष" असे करून घ्यावे," असा सल्ला भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJayant Patilजयंत पाटील