शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

व्यवसाय कराच्या चौदा हजार कोटींचे महाराष्ट्र सरकारने केले तरी काय?  माहिती अधिकारातून उघड झाली धक्कादायक माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 10:15 PM

राज्यात व्यवसाय कर संकलन विक्रीकर विभागामार्फत करण्यात येते. मात्र, जमा झालेल्या या भल्या मोठ्या रकमेचा विनियोग रोजगार हमी योजनेसाठी करणेच आवश्यक असताना तो नेमका कसा  केला याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही.

मुंबई -  महाराष्ट्र राज्यात गेल्या सात वर्षात व्यवसाय कराच्या माध्यमातून १४,०४७ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. राज्यात व्यवसाय कर संकलन विक्रीकर विभागामार्फत करण्यात येते. मात्र, जमा झालेल्या या भल्या मोठ्या रकमेचा विनियोग रोजगार हमी योजनेसाठी करणेच आवश्यक असताना तो नेमका कसा  केला याची माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात लागू केलेल्या व्यवसाय कराची माहिती मागितली होती. वित्त विभागाने अनिल गलगली यांस कळविले की राज्यात व्यवसाय कराचं संकलन विक्रीकर विभागाच्या मार्फत करण्यात येते. गेल्या 7 वर्षात महाराष्ट्र राज्यात 14047 कोटींचा व्यवसाय कर जमा झाला आहे.

2010-11             1683.16 कोटी

2011-12           1768.01 कोटी  

2012-13            1817.22 कोटी

2013-14             2146.68 कोटी

2014-15             2166.34 कोटी

2015-16             2169.13 कोटी

2016-17             2295.92 कोटी

सात वर्षात          14047 कोटी

व्यवसाय कराची जमा झालेली रक्कम कोणत्या कामासाठी वापरली, याबाबत अनिल गलगली यांनी माहिती विचारली होती. याबाबत गलगली यांना सरकारने  कळविले आहे की व्यवसाय कर हा राज्याच्या एकत्रित निधीमध्ये जमा होतो. एकत्रित निधीत जमा झालेली रक्कम विविध कामासाठी वापरली जाते त्यामुळे व्यवसाय करामधून जमा झालेली रक्कम नेमकी कोणत्या कामासाठी वापरली गेली   अशी स्वतंत्रपणे माहिती देता येणार नाही. अनिल गलगली यांच्या मते हा निधी रोजगार हमी योजनेसाठी खर्च करणे आवश्यक असताना एकत्रित निधीत जमा करणे गैर आहे. सरकारने याबाबत सर्व माहिती उघड करणे आवश्यक आहे.

श्रमजिवी संघटनेचे नेते माजी आमदार विवेक पंडित यांनी सरकार व्यवसाय कराच्या रकमेचा अप्रत्यक्ष गैरवापरच करत असल्याचं मत व्यक्त केले. त्यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना मुळात ज्या उद्देशाने कर आकारणी सुरु झाली त्या उद्देशासाठीच जमा झालेल्या रकमेचा विनियोग होणं आवश्यक असतं. मात्र आम्हीही प्रयत्न केला तरी माहिती मिळाली नव्हती असंही ते म्हणाले.

रोजगार हमीसाठी व्यवसाय कर   

महाराष्ट्रात १९७२मध्ये रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. ही योजना राबवण्यासाठी निधी जमवण्यासाठी संघटित क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांवर कर लावून पैसा जमा केला गेला. व्यवसाय करातून जेवढा निधी संकलित होईल तेवढाच निधी सरकार स्वत:चा वाटा उचलेल आणि रोजगार हमी योजना राबवली जावी असा उद्देश होता. बदलत्या काळानुसार रोजगार हमीची कामे कमी होत गेली. स्वाभाविकच खर्चही कमी झाला. मात्र त्याचवेळी काळानुरुप पगार वाढत गेल्याने व्यवसाय करातून संकलित होणारा निधी मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. मधील काळात सरकारने आपला वाटा देणेही बंद केले. आता नेमकी काय स्थिती आहे ते स्पष्ट होत नाही.

टॅग्स :Employeeकर्मचारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार