शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासांत जान्हवीने केले काय ?

By admin | Updated: June 11, 2015 02:04 IST

इस्टर्न फ्री वेवर आॅडी कारने टॅक्सीला धडक देऊन दोघांचे जीव घेणाऱ्या अ‍ॅड. जान्हवी गडकरने रात्री १० ते मध्यरात्री एक या वेळेत काय केले

मुंबई : इस्टर्न फ्री वेवर आॅडी कारने टॅक्सीला धडक देऊन दोघांचे जीव घेणाऱ्या अ‍ॅड. जान्हवी गडकरने रात्री १० ते मध्यरात्री एक या वेळेत काय केले, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आरपीएफ पोलीस करीत आहेत. अ‍ॅड. जान्हवीच्या दाव्यानुसार ती या वेळेत मरिन ड्राइव्हवर गाडी पार्क करून गाणी ऐकत बसली होती. पण तिने या काळात आणखी दारू ढोसली किंवा अन्य अमली पदार्थांची नशा केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, जान्हवीच्या पोलीस कोठडीत १२ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.याबाबत आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप राऊत यांना विचारले असता, आरोपी तरुणीच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल मिळालेला नाही. अहवालातून आरोपी तरुणी किती दारू प्यायली होती, दारूव्यतिरिक्त आणखी कोणत्या अमली पदार्थाचे सेवन तिने केले होते का, याचा खुलासा होऊ शकेल, असे ते म्हणाले.सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास जान्हवीने दारूच्या नशेत आपली आॅडी कार इस्टर्न फ्री वेवर विरुद्ध दिशेने वर चढवली. वाशीनाका परिसरातील बोगद्याच्या आधी तिने समोरून येणाऱ्या टॅक्सीला त्याच वेगात धडक दिली. त्यात टॅक्सीचालक हुसेन सय्यद आणि पुढे बसलेले सलीम साबूवाला जागीच ठार झाले. तर साबूवाला यांच्या पत्नी व दोन मुली गंभीररीत्या जखमी झाल्या, तर मुलगा नोमान जखमी झाला.जान्हवी सातच्या सुमारास हॉटेलमध्ये गेली. तिथे तिने मद्यपान केले. १० वाजता हॉटेलबाहेर पडली, मात्र तिच्या गाडीने झालेला अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. त्यामुळे मधल्या तीन तासांत काय केले, याबाबत पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली.फ्री वेवर विरुद्ध दिशेने कशी शिरली, हेही तिला आठवत नव्हते. मधल्या काळात तिने आणखी नशा केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. (प्रतिनिधी)