शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
3
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
4
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
5
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
6
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
7
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
8
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
9
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
10
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
11
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
12
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
13
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
14
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
15
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
17
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
18
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
19
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
20
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

घरातील नेतेगिरी! खासदार वर्षा गायकवाड यांना वडिलांनी कुठला कानमंत्र दिला होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 07:29 IST

बाबा जेव्हा धारावीमधून लोकसभेला उभे होते तेव्हा लोकांना वाटत नव्हते की ते निवडून येतील. त्यावेळी कुणाचाही फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता.

गाणे गुणगुणणे हेच माझ्यासाठी मेडिटेशन

मला गाण्याची आवड आहे, पण गाता येत नाही. काही लोक आवाज चांगला नसतानाही का गातात ते कळत नाही. आपल्या गाण्याबद्दल तसे कोणी बोलायला नको, हे माहीत असल्याने मी गात नाही. मात्र मला गाणी ऐकायला खूप आवडते. जुन्या काळातील बरीचशी गाणी माझी पाठ आहेत. ती गाणी गुणगुणायला आवडते. गाणी गुणगुणण्यामुळे मानसिक शांतता मिळते. मला वाटते गाण्यांच्या माध्यमातून मी अनेकदा मेडिटेशन करते.

रडायचं असेल तर राजकारणात येऊ नको!

बाबा निवडून आल्यानंतर मी नगरसेवक पदासाठी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र मला पक्षाने तिकीट दिले नाही. त्या वेळेस मला खूप वाईट वाटले आणि मी सतत रडत होते. माझ्या बाबांनी मला सांगितले, तुला योग्यवेळी पक्ष तिकीट देईल. परंतु जर तुला रडत बसायचे असेल आणि लढायचे नसेल तर तू राजकारणात येऊ नकोस. त्यानंतर मी कधीही रडले नाही आणि आजपर्यंत लढते आहे.

खवय्येगिरीची भरपूर आवड

मला चांगलेचुंगले पदार्थ खाण्याची खूप आवड आहे. मी स्वतः काही पदार्थ उत्तम बनवते. मला चायनीज, इटालियन पदार्थांसोबतच महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात. मला पुरणपोळी आणि साबुदाणा खिचडी आवडते. मुंबईचा स्पेशल वडापाव आवडतो. 

धरमशाला आवडते ठिकाण

लाँग ड्राइव्हला जायला नेहमीच आवडते. महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि तारकर्ली समुद्रकिनारा ही माझी आवडती ठिकाणे आहेत. सातारा जिल्ह्यातील माझे कोंडवे गावसुद्धा माझे खूप आवडते ठिकाण आहे. मात्र, धरमशाला हे ठिकाण माझे खूप आवडते असून, मी वारंवार तिथे जात असते.

ठरवून राजकारणात आले

मी राजकारणात अगदी ठरवून आले. माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी वक्तृत्व आणि अन्य काही स्पर्धांमध्ये भाग घेत नसले तरी मी विविध उपक्रमांमध्ये पुढे असायचे. माझे बाबा एकनाथ गायकवाड हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच गर्दी असायची. मी त्यांच्याजवळ बसून त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांना पाहत असायची. मला माणसांनी भरलेले घर नेहमीच आवडते. मला स्वतःला लोकांमध्ये राहायला आवडते. त्यामुळे मी राजकारणात स्वतःहून ठरवून आले. बाबा जेव्हा धारावीमधून लोकसभेला उभे होते तेव्हा लोकांना वाटत नव्हते की ते निवडून येतील. त्यावेळी कुणाचाही फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. नेते प्रचारासाठी येत नव्हते. अशा वेळेस मी, माझी बहीण आणि वीरेंद्र बक्षी तसेच सावंत या दोन-तीन कार्यकर्त्यांनी सातत्याने बाबांसोबत काम केले.

प्रेमविवाहानंतर पतीची राजकारणातही साथ

माझ्या पतीचे नाव राजू गोडसे आहे. आमचा प्रेमविवाह आहे. राजू यांनी आय.सी.डब्ल्यू.ए. मधून एमबीए केले. काहीकाळ त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केले. मात्र आता ते पूर्णवेळ माझ्यासोबत धारावी मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी काम करीत आहेत. त्यांनी नेहमीच राजकारणात आणि घरात माझी साथ दिली आहे.

टॅग्स :Varsha Gaikwadवर्षा गायकवाड