भारत जोडो यात्रेचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:00 IST2022-11-18T10:00:21+5:302022-11-18T10:00:58+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी आठ वाजता बाळापूर मार्गे मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले.

Welcome to Bharat Jodo Yatra in Matritirth Buldhana district | भारत जोडो यात्रेचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्वागत

भारत जोडो यात्रेचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्वागत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी आठ वाजता बाळापूर मार्गे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले.

यावेळी काँग्रेसच्या विविध आघाडीच्या नेत्यांसोबत सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात खासदार राहुल गांधी यांचे स्वागत केले. बाळापुर टी पॉइंट वर सिंदखेडराजा येथील श्रीमंत  लखोजी राजे जाधव परीवाराच्यावतीने खा. राहुल गांधी यांचे स्वागत झाले.यावेळी अकोला बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांसोबतच पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली होती.

भारत जोडो यात्रेदरम्यान सामाजिक सलोख्याचा परिचय देण्यासाठी जवळा रस्त्यावर पथनाट्य देखील सादर करण्यात आले. महागाईचा निषेध करण्यासाठी काही युवकांनी हातात फलक घेत राहुल गांधी यांचे यात्रेदरम्यान लक्ष वेधले. प्रदीप वखरिया यांनी महात्मा गांधींची वेशभूषा करून यात्रेत सहभागी झाले.  महात्मा गांधीच्या सत्याग्रहाची आठवण करून दिली. नंतर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने वतीने बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर भारत जोडो यात्रेचे स्वागत झाले. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, काँग्रेस नेते श्याम उमाळकर, दिलीपकुमार सानंदा, कुणाल बोंद्रे, विलास अवताडे, तेजेंद्रसिह चव्हाण , राष्ट्रवादीच्या संगीत भोंगळ यांनी यात्रेचे स्वागत केले.

Web Title: Welcome to Bharat Jodo Yatra in Matritirth Buldhana district