शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

वीकेण्डला तलाव क्षेत्रात पावसाची धम्माल, तीन दिवसांत ३२ दिवसांचा जलसाठा वाढला

By admin | Updated: July 4, 2016 19:47 IST

मुंबईत कोसळणाऱ्या धो धो पावसाने तलाव क्षेत्रातही बरसू लागला आहे़ वीकेण्डलाच तलावांमध्ये जोरदार हजेरी लावत पावसाने ३२ दिवसांचा जलसाठा वाढविला आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ४  मुंबईत कोसळणाऱ्या धो धो पावसाने तलाव क्षेत्रातही बरसू लागला आहे़ वीकेण्डलाच तलावांमध्ये जोरदार हजेरी लावत पावसाने ३२ दिवसांचा जलसाठा वाढविला आहे़ एकूण जलसाठ्याच्या १५ टक्केच हा साठा आहे़ मात्र पाणीटंचाईच्या काळात ही वाढही दिलासा देणारी आहे़ जून महिना संपत आला तरी पावसाळी ढग तलाव क्षेत्रात फिरकत नव्हते़ त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालवत होती़ मुंबईत पाऊस जोरदार असला तरी तलाव क्षेत्र मात्र कोरडीच राहत होती़ मात्र वीकेण्डला हजर झालेल्या पावसाने तलाव क्षेत्रातील वातावरणच बदलून टाकले़ जोरदार बॅटिंग करीत पावसाने तलाव क्षेत्रातील जलसाठा २० ते ३० हजार दशलक्ष लीटरने वाढविला़ तीन दिवसांमध्ये तलावांत तब्बल एक लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला़ यामुळे ३२ दिवसांचे जलसाठा तयार झाला आहे़ वर्षभर आवश्यक जलसाठ्याच्या हा १५ टक्केच साठा असल्याने पाणीकपात मात्र कायम राहणार आहे़.

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलाव-कमाल किमान आजची स्थितीआजचा पाऊस(मि़मी़)

मोडक सागर १६३़१५१४३़२६१४५़१४९७़६० तानसा१२८़६३११८़८७१२२़१३११०़०० विहार८०़१२७३़९२७६़७६९०़०० तुळशी१३९़१७१३१़०७१३५़०६९३़०० अप्पर वैतरणा ६०३़५१५९५़४४५९४़८२११५ भातसा१४२़०७१०४़९०११३़३०११८ मध्य वैतरणा २८५़००२२०़००२४७़१४१६२़३०

एकूण २०१६ २२७८२७ दशलक्ष लीटर २०१५- ३२६२२३ दशलक्ष लीटर

 मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़   गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़  मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़.