लग्नसोहळे सेवाकर विभागाच्या रडारवर!

By Admin | Updated: August 16, 2014 03:02 IST2014-08-16T03:02:13+5:302014-08-16T03:02:13+5:30

दिमाखदार लग्नसोहळ्यापासून ते घरगुती सोहळ्याच्या किंवा कंपनीच्या सोहळ्याच्या प्रसिद्धीपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना आता अधिक सावधानता बाळगणे गरजेचे

Wedding services service radar on the radar! | लग्नसोहळे सेवाकर विभागाच्या रडारवर!

लग्नसोहळे सेवाकर विभागाच्या रडारवर!

मनोज गडनीस, मुंबई
दिमाखदार लग्नसोहळ्यापासून ते घरगुती सोहळ्याच्या किंवा कंपनीच्या सोहळ्याच्या प्रसिद्धीपर्यंत कोणत्याही गोष्टीचे नियोजन करताना आता अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण या आणि अशा सर्व गोष्टींत ‘सेवा’ दडलेली असल्याने त्यावर ‘सेवा कर’ भरणे बंधनकारक आहे, अन्यथा सेवा कर विभागाचे अधिकारी तुमच्या ऐन कार्यक्रमात दाखल होऊन पार्टीच्या रंगाचा बेरंग करू शकतात.
केंद्रीय अर्थसंकल्पात अप्रत्यक्ष कराच्या लक्ष्यामध्ये वाढ केल्यानंतर, कर वसुली हे आव्हानात्मक असल्याची विभागांतर्गत चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर देशभरातील सेवा कर आयुक्तांची वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी बैठक झाली आहे. त्यात थेट वित्तमंत्र्यांनीच या अधिकाऱ्यांना ‘सक्रिय’ होण्याचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
‘सक्रिय’ होणे म्हणजे नेमके
काय करायचे यावरदेखील या बैठकीत विस्तृत ऊहापोह झाला. सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, विविध शहरांत अथवा गावात होणारे दिमाखदार
लग्नसोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, सिनेतारकांचे कार्यक्रम यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षाकरिता अप्रत्यक्ष कराचे लक्ष्य
६ लाख २४ हजार कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
२०१३-१४ या आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष कराचे संकलन ४ लाख ९६ हजार कोटी रुपये इतके झाले होते. त्या तुलनेत यंदाचे लक्ष्य २६ टक्के अधिक आहे.

Web Title: Wedding services service radar on the radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.