शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बाळासाहेबांच्या 'त्या' भूमिकेनं आम्हाला धक्काच बसला; शरद पवारांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 11:54 IST

या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.

मुंबईः बाळासाहेबांची विचारधारा आणि कामाची पद्धत भाजपाच्या विचारांशी सुसंगत होती, असं मला कधीच वाटलं नाही. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपाच्या लोकांच्या कामाच्या पद्धतीत जमीन आस्मानचा फरक आहे, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले आहेत.(Sharad Pawar Sanjay Raut Interview) संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेल्या खास मुलाखत ते बोलत होते. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींचा केला. त्यांनी अडवाणींचा केला. त्यांनी प्रमोद महाजन यांचा केला. या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.सेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती, असं वाटत नाही. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या देशातील एकमेव संघटना अशी असेल, की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भविष्याची काही स्थिती यत्किंचीत तमा न बाळगता पाठिंबा द्यायचा. ते शिवसेनेच्या नेत्यांनीच केलं. ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या विरोधात अख्खा देश होता, त्यावेळी शिस्त आणणारं नेतृत्व म्हणून त्याच्याबरोबर बाळासाहेब उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाही, तर आम्हाला लोकांना त्यावेळी धक्काच बसला. तेव्हा बाळासाहेबांनी भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या निवडणुकीला उमेदवारसुद्धा उभा करणार नाही, असंही पवारांनी सांगितलं आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)

गेली पाच वर्षं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी सेना आणि भाजपाचं सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा मतदार आणि सेनेचा कार्यकर्ता यांच्यात सरकारबद्दल अस्वस्थता होती. सेनेची काम करण्याची पद्धत ठोसपणानं गोष्ट राबवायची होती. भाजपाने त्यांना गप्प बसवण्याचा, बाजूला ठेवण्याची भूमिका सातत्यानं घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेने जी पाच वर्षं पाहिली, ती भाजपाचं सरकार असल्याचीच होती. याच्याआधी असं नव्हतं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं. नेतृत्व शिवसेनेकडे होते. बाळासाहेबांची भक्कम भूमिका होती. मागच्या पाच वर्षांत सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजपा म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या काळात भाजपाच्या विचारानेच चालणार ही भूमिका घेऊन पावलं टाकली. ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नव्हती. दुसरं कुणी राजकारण करू शकत नाही, असं वाटत होतं, असं म्हणत पवारांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. 

मी येणार, मी येणार आणि मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. मीच येणार ही भूमिका घेऊन मतदाराला गृहित धरलं तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा दर्प आहे आणि धडा शिकवला पाहिजे, असं जनतेनं ठरवलं.  कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलोय, असा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा

भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली

'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण

"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार

लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत

कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार

CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत