स्वप्ने पूर्ण करण्याची आमच्यात ताकद; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:39 IST2024-03-02T07:39:11+5:302024-03-02T07:39:37+5:30
अंतरिम अर्थसंकल्पावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

स्वप्ने पूर्ण करण्याची आमच्यात ताकद; अजित पवारांनी विरोधकांना सुनावले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य चालविताना आम्ही मोठी स्वप्ने बघतो आणि ती पूर्ण करण्याचीही ताकद आमच्यात आहे, आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची क्षमताही आमच्या सरकारमध्ये आहे, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत विरोधकांना सुनावले.
अंतरिम अर्थसंकल्पावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना पवार यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे असे सांगून त्यांनी राज्यावरील कर्जाची विरोधकांनी चिंता करू नये. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये किती मोठा बोजा आहे ते बघावे. उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अनावश्यक खर्च टाळण्यात येत आहे. कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यापुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली जाईल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.
महानंदा सरकारकडेच
nमहानंदा डेअरी कोणाच्याही घशात घातली जाणार नाही हे स्पष्ट करतानाच राज्यात प्रतिदिन १ कोटी ६० लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी २८३ कोटींची आवश्यकता आहे.
nयापैकी २०४ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
टोपे इकडे येऊन जा
राज्याची आर्थिक परिस्थिती, जीएसटीतून राज्याला मिळणारा निधी यावर अजित पवार बोलत असताना जीएसटीमुळे
सर्वसामान्य व्यापारी त्रासला आहे, अशी टीका केली.
ज्येष्ठ सदस्य राजेश टोपे यांनीही जीएसटीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर, टोपे आपण इकडे या, सगळे प्रश्न सुटतील अशी ऑफर अजित पवार यांनी दिल्याने सभागृहात हशा पिकला.