शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

हमें अभी पढना है...

By admin | Published: July 02, 2016 4:41 AM

अल्पवयीन असतानाही पालकांनी लग्न ठरवले. पण मनात शिक्षणाची ओढ.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- अल्पवयीन असतानाही पालकांनी लग्न ठरवले. पण मनात शिक्षणाची ओढ. अशा कठीण परिस्थितीत ‘हमे अभी पढना है...’ असे म्हणत लग्न ठरलेल्या मोठ्या बहिणीसह धाकट्या दोघींनीही घर सोडल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. तिघीही अल्पवयीन आहेत. त्यांचा अद्याप शोध लागला नसून याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करत आहेत.मानखुर्द परिसरात मीना (१७), सलमा (१६) आणि रेश्मा (१५) (नावे बदललेली आहेत) या तिघी बहिणी कुटुंबियांसोबत राहतात. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मोठी बहीण असलेल्या मीनाची लगीन घाई घरात सुरू झाली. मात्र आपल्याला अजून शिकायचे असल्याचे सांगत तिने लग्नाला विरोध केला. लग्नायोग्य झाल्यानंतरच लग्न करण्याचा आपला निर्णय तिने सांगितले. मात्र कुटुंबीयांकडून तिच्यावर दडपण आणले जात होते. बळजबरी सुरू होती. त्यामुळे घरच्यांच्या दबावाला कंटाळून मीनाने घर सोडण्याचे ठरविले. ताईनंतर आपल्याही लग्नासाठी घाई केली जाईल या भीतीने इतर दोघींनीही मीनासह घर सोडण्याचा निर्णय घेतला. २६ जूनच्या मध्यरात्री घरातली मंडळी गाढ झोपेत असताना या तिघी आपले सामान घेऊन घर सोडून निघून गेल्या.रमजान सुरूअसल्याने उपवासापूर्वीचे जेवण करण्यासाठी २७ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचे कुटुंबिय उठले. मुलींच्या खोलीत गेले असता तिन्ही मुली खोलीत नसल्याचे आढळले. शिवाय कपाटातील काही कपडेही जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आले. कुटुंबियांनी मित्र मंडळी, नातेवाईकांकडे शोध सुरू केला. दुपारपर्यंत सगळीकडे त्यांचा शोध घेतल्यानंतर मुली घर सोडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. नंतर मुलीचे मनाविरुद्ध लग्न लावण्याचे ठरल्याने ती घरात भांडत होती, असे चौकशीत पोलिसांना समजले. त्यामुळे प्राथमिक तपासात मनाविरुद्ध लग्न जुळविल्याने या मुलींनी घर सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग भोसले यांनी दिली. >मानखुर्दमधील घटना२७ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास रोजा सुरू होण्यापूर्वीच्या जेवणासाठी कुटुंबीय उठले. त्यांना तिन्ही मुली खोलीत नसल्याचे आढळले. शिवाय कपाटातील काही कपडेही जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आले.