शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Devendra Fadnavis : "आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा दिली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 10:39 IST

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे.

मुंबई - १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. मात्र त्याच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आली आहे. त्यावरून भाजपाने मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावरून आता राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं आहे. "आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना दोषी ठरवलं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना कोण संरक्षण देतं हे आपण पाहिलं आहे. मंत्री बनवलेले त्यांचे (दहशतवादी) साथीदार आजही तुरुंगात बसले आहेत. आमच्या सरकारमध्ये हिंमत होती. आम्ही रात्री सुप्रीम कोर्ट उघडून बॉम्बस्फोटातील दोषींना शिक्षा दिली" असं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. मविआ आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे. 

 "एका अतिरेक्याला मानसन्मान का दिला, तेव्हा कोणाचं सरकार होतं?"

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. "एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला, तेव्हा केंद्रात आणि राज्यात कोणाचं सरकार होतं?" असा रोखठोक सवाल विचारला. "सणासुदीच्या काळात राजकारण करू नये. याकूब मेमन प्रकरणातील काही तथ्य लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आरोप करणं हे खूप सोपं असतं पण खरं बोलणं हे कधी कधी कठीण असतं, खरं बोलणं आज गरजेचं आहे. त्या माणसाचं दफनच का झालं? तो अतिरेकी होता. त्याचं दफन करण्याची गरज नव्हती. दफन करायचं असेल तर एनओसी घ्यायची असते. ती का घेतली नाही? पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय