शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

राज्य बालनाट्य स्पर्धेत ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:43 AM

सांस्कृतिक संचालनालयाचे आयोजन; सोलापूरच्या ‘उजगोबा’ला तृतीय बक्षीस

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (उपनगरीय शाखा) उजगोबा या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संकल्प युथ फाउंडेशनच्या झाडवाली झुंबी या नाटकास द्वितीय पारितोषिक स्पर्धेत एकूण ५१ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले

सोलापूर : महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये उस्मानाबाद-सोलापूर केंद्रामधून आम्ही सावित्रीच्या लेकी या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. भूम येथील मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेने हे नाटक सादर केले होते. संकल्प युथ फाउंडेशनच्या झाडवाली झुंबी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (उपनगरीय शाखा) उजगोबा या नाटकाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. या तीनही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धा तीन ते १८ जानेवारी दरम्यान उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे झाल्या. स्पर्धेत एकूण ५१ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सुरेंद्र केतकर, बाळासाहेब नवले, राजेश दुर्गे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेचा निकाल : दिग्दर्शन : प्रथम-पारितोषिक मंगल माळी (आम्ही सावित्रीच्या लेकी), द्वितीय-राधिका खोटे (झाडवाली झुंबी), तृतीय- मिहीका शेंडगे (उजगोबा).  प्रकाश योजना : प्रथम - देवदत्त सिद्धम (उजगोबा), द्वितीय- संध्या मरोड (झाडवाली झुंबी), नेपथ्य : कृष्णा हिरेमठ (उजगोबा), द्वितीय- रामेश्वरी घुंटे (झाडवाली झुंबी). रंगभूषा : प्रथम - प्रणाली बनसोडे, (दुष्काळावर करु मात), द्वितीय- ध. सु. गुजरे (आम्ही सावित्रीच्या लेकी).

उत्कृष्ट अभिनय : रौप्य पदक - ईश्वरी होनराव (आम्ही सावित्रीच्या लेकी) व श्वेता भोसले (झाडवाली झुंबी). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र : संहिता देशमुख (एक झाड मायेचं), साक्षी कनका (निबंध), जान्हवी गोटे (बंड्या भडभडेची बडबडी बायको), सांची कांबळे (उजगोबा),  श्राविका जाधव        (आम्ही सावित्रीच्या लेकी), विश्वतेज भाळे (दुष्काळावर करु मात), आर्यन कनगुडे (सगळे आम्हालाच का बोलतात), नवल दौंतुल (आम्हाला गांधी व्हायचंय), प्रणव रामदासी (आम्ही नाटक करीत आहोत), साईप्रसाद नाशिककर (निबंध).

टॅग्स :Solapurसोलापूरchildren's dayबालदिनmarathiमराठीMarathi Natya Sammelanमराठी नाट्य संमेलन