We are in Kolhapuri, the world: The concept of 'Koi Kohi Roadpay Na Aay' advertisement | आम्ही कोल्हापूरी, जगात भारी :  'कोई भी रोडपे ना आये' जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरची

आम्ही कोल्हापूरी, जगात भारी :  'कोई भी रोडपे ना आये' जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरची

ठळक मुद्देआम्ही कोल्हापूरी, जगात भारी : 'कोई भी रोडपे ना आये' जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरचीपंतप्रधानांनी केले कौतुक : भाषणात संकल्पना केली व्हायरल

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोरोनाची भयावहता दाखविणारे आणि रस्त्यावर फिरु नका असे सांगणारे 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीचे डिझाईनचे कौतुक करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला उद्देश्शून केलेल्या भाषणादरम्यान व्हायरल केले. विकास सदानंद डिगे या कोल्हापूरच्याकलाकाराची ही संकल्पना असून मोदी यांनी दुसऱ्यांदा कोल्हापूरच्या कलाकाराचा सन्मान केला आहे. आम्ही कोल्हापूर, जगात भारीचे प्रत्यंतर पुन्हा आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातून कोरोना विषाणूविषयी काळजी घेण्याचे आणि देशात २१ दिवस लॉक डाउन करण्याची घोषणा केली. या भाषणादरम्यान कोरोना : 'कोई भी रोडपे ना आये' असे लिहिलेल्या जाहिरातीचा फलक दाखवून कोरोना विषाणूविषयी सावध राहण्याचे आवाहन केले. ही संकल्पना मोदी यांना आवडल्यामुळे त्यांनी त्याचे कौतुक करुन आवर्जुन या संकल्पनेचा उल्लेख केला.

या जाहिरातीची संकल्पना कोल्हापूरचे पहिले खासदार शंकरराव खंडेराव डिगे यांचे नातू आणि चळवळीतील कार्यकर्ते व एस.के. डिगे फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांचे चिरंजीव विकास डिगे यांची आहे. सदानंद डिगे यांना महराष्ट्र सरकारचा समाजभूषण पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांचे चिरंजीव विकास यांनी कलानिकेतन मधून कमर्शियल आर्टची पदवी घेतली असून गेली सात वर्षे ते अ‍ॅड टुमारो अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टुडिओ ही जाहिरातविषयक कंपनी चालवतात.

कोरोनाविषयी चालविलेल्या मोहिमेसाठी तयार केलेल्या 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीच्या संकल्पनेत अतिशय सोप्या शब्दात या विषाणूविषयीची भयावहता मांडण्यात आली आहे. ही जाहिरात १९ आणि २0 मार्च रोजी सोशल मिडियावरुन खूपच व्हायरल झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू रविवार, दि. २२ मार्च रोजी जाहीर केला.

या दिवशीही ही जाहिरात सोशल मिडियावरुन व्हायरल केली. तिला खूपच प्रतिसाद मिळाला.नरेंद्र मोदींच्या पाहण्यात ही जाहिरात आल्याने त्यांनी मंगळवारच्या भाषणात याच्या संकल्पनेचे कौतुक केले. ही जाहिरात विकास डिगे यांनी मोदी यांना ट्विटरवरुन टॅग केली आहे.

मोदींकडून कोल्हापूरच्या कलाकाराचा दुसऱ्यांदा दाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरच्या कलाकारांना दुसºयांदा दाद दिली आहे. यापूर्वी निर्मिती अ‍ॅडर्व्हटायजिंगचे अनंत खासबारदार यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी तयार केलेल्या लोगोचे कौतुक करुन त्यांचा अधिकृतरित्या सन्मान करण्यात आला होता. आताही कोरोनाविषयीच्या संकल्पनेलाही मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून दाद दिली आहे.


कोरोना विषाणूविषयीची गंभीरता समाजासमोर येण्यासाठी सोप्या भाषेत जाहिरात करणे गरजेचे होते. यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून ही जाहिरात आम्ही तयार करुन व्हायरल केली. पंतप्रधानांनी या जाहिरातीचे कौतुक करुन एका अर्थी कोल्हापूरच्या कलाकाराचा सन्मानच केला आहे.
विकास डिगे,
प्रमुख, अ‍ॅड टुमारो अ‍ॅडव्हर्टायजिंग स्टुडिओ, कोल्हापूर.

Web Title: We are in Kolhapuri, the world: The concept of 'Koi Kohi Roadpay Na Aay' advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.