बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून मार्ग काढला जाईल- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:54 PM2021-08-24T19:54:07+5:302021-08-24T19:54:14+5:30

मुंबई:बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...

The way will be paved by sitting in the circle of law regarding bullock cart race- Jayant Patil | बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून मार्ग काढला जाईल- जयंत पाटील

बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून मार्ग काढला जाईल- जयंत पाटील

Next

मुंबई:बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मंत्रालयात जमलेल्या शेतकरी बांधवांना दिले. मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होत. 

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडा स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतल्याबद्दल जयंत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. 

राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. याकरीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. 

संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडा शर्यत सुरु आहे. त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांच्या संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले. 

गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शेतकरी आणि बैलगाडा मालक आणि विविध संघटनांची शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठका बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडा मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडा शर्यतीविषयी मनोगत मांडले.

Web Title: The way will be paved by sitting in the circle of law regarding bullock cart race- Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.