शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत भीषण पाणीटंचाई, नऊ मोठ्या प्रकल्पांत केवळ १५.९० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 20:17 IST

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अमरावती - पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अमरावती शहरालाही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने आता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला किमान एक महिना काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पांत १६.१५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात २४.७९ टक्के, अरुणावती प्रकल्पात ११.२८ टक्के, बेंबळा प्रकल्पात २१.०६ टक्के, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात १३.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वान प्रकल्पात सर्वाधिक ३४.०६ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीसाठ्याची स्थिती भीषण असून, नळगंगा प्रकल्पात फक्त ८.०९ टक्के, तर पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या पाणीसाठा साप्ताहिक अहवालात नमूद आहे. नऊ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा १५१८.६४ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा फक्त २४१.४४ दलघमी शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांचीही हीच स्थिती आहे.  २४ मध्यम प्रकल्पांत १८.२१ टक्के पाणीसाठा पश्चिम विदर्भातील मध्यम प्रकल्पांचीसुद्धा यंदा बिकट स्थिती आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी १८.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत. अमरावती जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ३५.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत २२.०७ टक्के, अकोला जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ४.९१ टक्के, वाशिम जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पांत ८.१३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांत ९.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती