उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 19:58 IST2025-10-23T19:56:44+5:302025-10-23T19:58:27+5:30
Ulhasnagar Municipal Corporation: उल्हासनगरमध्ये नागरिकांनी रिकामे हंडे ठेवून महापालिका पाणीपुरवठा विभागाचा काळ्या शाईने निषेध केला.

उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
उल्हासनगर: कॅम्प नं-५, तानाजीनगर मध्ये ऐण दिवाळीच्या दिवसी पाण्याचा ठणठणात झाल्याने, नागरिकांनी घरासमोर रिकामा हंडा ठेवून महापालिका पाणीपुरवठा विभागाचा काळ्या साईने लिहून निषेध केला. दिवाळीपूर्वी महापालिका आयुक्तानी पाणी गळतीचा ठेका देऊन पाणी पुरावठा नियमित होणार असल्याचे संकेत दिले होते.
उल्हासनगरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, भाजपा नेते नरेंद्र राजांनी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी एकत्र येत कॅम्प नं-५ येथील पाणी पुरवठा विभागावर मोर्चा काढला होता. त्यानंतर आयुक्तानी जलवाहिनी पाणी गळती थांबविण्यासाठी ८४ लाखाच्या निधीतून ठेका दिला. मात्र पाणी गळती व पाणी टंचाई कायम असल्याचे चित्र शहरांत आहे. कॅम्प नं-५ येथील तानाजीनगर व परिसरात ऐण दिवाळी सणा दरम्यान पाणी टंचाई निर्माण झाली. महिलांवर पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली.
महिलांनी घरा समोर रिकामा पाण्याचा हंडा ठेवून काळ्या साईने महापालिका पाणी पुरावठा विभागाचा निषेध असल्याचे लिहून संताप व्यक्त केला. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुले यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, होऊ शकला नाही. दरम्यान त्यांच्या बदलीची मागणी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या नेत्याकडून होत आहे. अशोक घुले यांचे फक्त पाणी पुरवठा वितरण योजना व भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराकडे असल्याची टिकाही होत आहे.