शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरचे गुंतवणूकदार विदेशातही

By admin | Updated: August 3, 2014 00:57 IST

एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रमुख प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये

पोलीस कोठडीत वाढ : दोघांना ६ पर्यंत तर एकाला ४ पर्यंतनागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रमुख प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये ६ आॅगस्ट तर विनय वासनकरच्या कोठडीत ४ आॅगस्टपर्यंत वाढ केली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढाणे यांनी या तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास खूप किचकट आहे. आरोपींना आमोरासमोर बसून विचारपूस करावी लागत आहे. आतापर्यंत या कंपनीविरुद्ध एकूण ७९ ठेवीदारांच्या तक्रारी आल्या आहेत आणि १७ कोटी ५४ लाख एवढ्याची फसवणूक या तक्रारींमध्ये नमूद आहे. आणखी नव्याने ११ गुंतवणूकदारांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या ठेवी १ कोटी ४८ लाख एवढ्या आहेत. या कंपनीचे गुंतवणूकदार अबूधाबी, युएई, दुबई, युएसएस या ठिकाणी तसेच देशभरात आहेत. जवळपास ५ हजार गुंतवणूकदार आहेत. या कंपनीने किती रक्कम त्यांच्याकडून स्वीकारली व त्याची गुंतवणूक कुठे केली याचा तपास करणे आहे. ७० ते ८० टक्के रोख रक्कम स्वीकारली होती. या रकमेतून कोणती मालमत्ता खरेदी केली याचाही तपास करायचा आहे. या आरोपींचा नऊ दिवसपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी सरकारपक्षातर्फे करण्यात आली. सरकार पक्षाला मदत म्हणून गुंतवणूकदारांचे वकील अ‍ॅड.बी.एम. करडे, अ‍ॅड. वंदन गडकरी, अ‍ॅड. गजेंद्र सावजी यांनी बाजू मांडली. तर आरोपींचे वकील शाम देवानी, अ‍ॅड, डोडाणी, आनंद देशपांडे यांनी पोलीस कोठडीचा विरोध केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी याला ६ आॅगस्टपर्यंत व विनय वासनकरला ४ आॅगस्टपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड सुनवला. यांना २७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती व आजपर्यंतचा पीसीआर घेण्यात आला होता. पीसीआरची मुदत संपल्याने आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)