वाशिम - शेलुबाजारवरुन लोणार साठी निघाली कावड
By Admin | Updated: August 8, 2016 17:50 IST2016-08-08T17:50:37+5:302016-08-08T17:50:37+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार ८ आॅगस्ट रोजी ५१ शिवभक्त शेलुबाजारवरुन लोणारसाठी कावड घेऊन ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’

वाशिम - शेलुबाजारवरुन लोणार साठी निघाली कावड
>ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. 08 - दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार ८ आॅगस्ट रोजी ५१ शिवभक्त शेलुबाजारवरुन लोणारसाठी कावड घेऊन ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’ च्या जयघोषात निघाले आहे. शेलुबाजार येथील आराध्य दैवत श्री सतिआई माता मंदिरातून पांडुरंग कोठाळे यांच्या हस्ते पूजा करुण कावडला सुरवात करण्यात आली. नंतर श्री महादेव मंदिर संस्थान येथून दर्शन घेऊन गावातून मिरवणूक काढली .गावातील महिलांनी पूजा करुण दर्शन घेतले ही कावड मालेगांव , मेहकर मार्गे जाणार व ११ आॅगस्ट रोजी लोणार येथील सरोवर संस्थान येथील श्री महादेवाचे दर्शन व कावडमध्ये पाणी घेऊन १५ आॅगस्ट रोजी परतीचा प्रवास सुरु करुन शेलूबाजार येथील श्री महादेवाच्या पिंडिवर पाणी चढविणार आहे. या कावड यात्रेमध्ये सतिष भोसले ,पवन ठाकरे ,
श्रीकांत बारड, बंटी नाकाडे , शंकर पडोलकर , गणेश चव्हाण , गणेश बरडे , वैभव क्षीरसागार, अजय मुळे, शिवा पवार , सतिष पवार , अजय राजगुरे , अंकुश निंबाळकर , योगेश डोके, कुलदीप गाढवे , विष्णु लहेकर , राहुल खंडारे , रोहित कांबळे आदी शिवभक्त व गावकºयांनी भाग घेतला आहे