शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Ashish Shelar : अमित शाहंच्या 'त्या' भाषणाची क्लिप लिक झाली, की केली गेली? शेलारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:32 IST

मुंबईतील 'त्या' बैठकीनंतर अमित शाह यांच्या भाषणाच्या क्लिप्स जबरदस्त व्हारल झाल्या होत्या. यासंदर्भात आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाष्य केले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह गेल्या 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पांच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांच्या बैठकीत मार्गदर्शनही केले होते. या बैठकीनंतर त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स जबरदस्त व्हारल झाल्या होत्या. यासंदर्भात आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाष्य केले आहे. ते लोकमतसोबत बोलत होते.

अमित शाह मुंबईत आले आणि बैठक घेतली. यानंतर त्यांच्या भाषणाच्या क्लिप्स लिक झाल्या. म्हणजे येथे भाषण झाले आणि तेथे माध्यमांसमोर क्लिप लिक झाल्या. आपण मुंबई भाजपचे अध्यक्ष आहात, आपल्या कार्यकाळात हे सर्व होत आहे, आपल्याला नाही वाटत हे मोठे ब्लंडर आहे? असे विचारले असता, शेलार म्हणाले, "आपल्याला कुणी सांगितलं, की आम्हाला हे चुकीचं झालं आहे, असं वाटतंय?" यावर आपण चौकशी लावली, असे विचारले असता, "मी अशा काहीही चौकशीचे बोललेलो नाही. मी आज पहिल्यांदाच यावर बोललो आहे. एवढेच नाही, तर राजकारणात अनेक हातखंडे वापरायचे असतात, अभी तो शुरुवात है सर...", असेही शेलार म्हणाले. 

'त्या' बैठकीत काय म्हणाले होते अमित शाह? -२०१९ च्या निवडणूक निकालानंतर अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द मोडला, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा करत अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. "ज्यांना धोका सहन करण्याची सवय असते ते आपले स्थान कधीही मजबूत करू शकत नाहीत. जो धोका देतो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. उद्धव यांनी आपल्याला धोका दिला. जनमताचा अनादर करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविले. आता त्यांना जमीन दाखवा. राजकारणात सगळे सहन करा पण धोका सहन करू नका. मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेने भाजपचा आणि जनतेचाही विश्वासघात केला," असे शाह यांनी म्हटले होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपा