शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी मंडळीं अर्ध्या रस्त्यावरुन फिरले माघारी... वाचा ‘ हे ’ आहे कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 21:20 IST

रमेश (नाव बदलले आहे) याने पोलीस आहोत असे सांगून सुरुवातीला सोयरीक जमवली. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदरच त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली...

ठळक मुद्देलग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला अटक : लाचखोरीचे प्रकरण 

पुणे : आपण पोलिस असल्याचे सांगून सोयरीक जमवली. बोलणी होऊन लग्नाची तारीख देखील ठरली. लग्नाला अवघ्या काही दिवसांचा  कालावधी शिल्लक राहिला असताना त्याला दुर्बुध्दी झाली. एका लाचखोरीच्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने लग्न ठरले आहे म्हणून जामीन मंजूर केला. मात्र तोपर्यंत खुप उशीर झालेला होता. मुलीकडच्यांनी त्या मुलाची सोयरीक नाकारली होती. गुरुवारी ४ वाजता जामीन मिळाल्यानंतर साडेचारच्या दरम्यान व-हाड लग्नाच्या ठिकाणी जायला निघाले. मात्र मध्येच त्यांना लग्न मोडल्याचे समजले. त्यामुळे अर्ध्या रस्त्यात पोहचलेले वऱ्हाडी मंडळी निराश होऊन माघारी फिरले. रमेश (नाव बदलले आहे) याने पोलीस आहोत असे सांगून सुरुवातीला सोयरीक जमवली. मात्र लग्नाच्या एक दिवस अगोदरच त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली. ही गोष्ट मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर लग्नाला येणाऱ्या वऱ्हाड मंडळींना त्यांनी लग्न मोडल्याचे कळवले. रमेशसह अजित याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १ लाख ६ रुपयांची लाच घेताना बुधवारी अटक केली. तक्रारदाराविरुद्ध गुन्हे शाखेने मोहननगर येथे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पैसे द्यायचे असल्याचा बनाव करून व आपण पोलिस असल्याचे सांगत त्यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी केली होती. रमेशचे सातारा जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न ठरले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सातारा येथे त्यांचा विवाह होता. त्यामुळे जामीन मिळाला नसता तर लग्न पुढे ढकलावे लागले असते. मात्र त्यांचे वकील ड. प्रताप परदेशी यांनी रमेशचे लग्न असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे जामीन देण्याची मागणी मान्य करीत विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारmarriageलग्न