शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
3
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
4
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
5
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
6
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
7
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
8
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
9
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
10
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
11
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
12
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
13
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
14
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
15
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
16
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
18
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग फेररचनेने वाढवले नगरसेवकांचे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 05:18 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या प्रभाग फेररचनेत शहरातील सात प्रभाग कमी झाल्याची खबर लागताच नगरसेवक धास्तावले आहेत.


मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सुरू असलेल्या प्रभाग फेररचनेत शहरातील सात प्रभाग कमी झाल्याची खबर लागताच नगरसेवक धास्तावले आहेत. एकीकडे आरक्षणात प्रभाग हातून निसटण्याची टंगती तलवार, आणि त्यातूनही वाचल्यास प्रभागांच्या फेररचनेचा फास अशा कैचीत सापडण्याची चिन्हे दिसल्याने नगरसेवकांची धावाधाव सुरू आहे. काही नगरसेवकांनी आपले राजकीय वजन वापरून प्रभागांच्या नवीन सीमारेषेचा अभ्यास सुरू केला आहे. तर काही दिग्गजांनी आपल्या प्रभागांसह आसपासच्या प्रभागांमध्येही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
२०१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या उपनगरांकडे स्थलांतरित झाली. त्यामुळे लोकसंखेच्या आधारे प्रभागांची फेररचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र या फेररचनेच्या पहिल्याच बदलाने शहरातील नगरसेवकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शहर भागातील नगरसेवकांची संख्या ६३ वरुन ५६ वर घसरली आहे. अन्य प्रभागांमध्ये विलीन करण्यात आल्याने प्रभागांचे आकारमानही वाढणार आहे. याचा फायदा उपनगरांना होणार आहे. शहरात सातजणांना घरी बसावे लागत असताना उपनगरांमध्ये इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र प्रभाग फेररचना आणि आरक्षण असे दुहेरी संकट अद्यापही नगरसेवकांवर घोंघावत आहे. त्यामुळे दिग्गजांनी आपला दावा कायम राहण्यासाठी विद्यमान व संभाव्य प्रभागात आपला निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. फेररचनेचा अंतिम मसुदा जाहीर होण्याआधीच अनेक बड्या नगरसेवकांनी आपल्या नविन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करून मतदारांचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग रचनेतील बदल
कुलाबा, पायधुनी, चंदनवाडी, ग्रँटरोड, भायखळा या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक तर प्रभादेवीमध्ये दोन प्रभाग कमी झाले आहेत. त्यामुळे शहरातील नगरसेवकांची संख्या घटली आहे.गोरेगाव, दहिसरमध्ये प्रत्येकी एक आणि मालाड, कांदिवलीत प्रत्येकी दोन प्रभाग वाढले आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरत नगरसेवक संख्या ९७ वरून
१०२ इतकी झाली आहे.
चेंबूर, घाटकोपरच्या हद्दीतील प्रत्येकी एक प्रभाग कमी झाला. तर कुर्ला, भांडुपमध्ये प्रत्येकी एक आणि मानखुर्दमध्ये दोन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे पूर्व उपनगरांत प्रभागांची संख्या ६७ वरुन ६९ होणार आहे.