शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

बेस्ट कर्जाच्या आणि कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत

By admin | Published: May 19, 2017 7:51 PM

महापालिकेने मदतीच्या आश्वासनावरच बोळवण केल्याने बेस्ट उपक्रमाचे आर्थिक संकट कायम आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - महापालिकेने मदतीच्या आश्वासनावरच बोळवण केल्याने बेस्ट उपक्रमाचे आर्थिक संकट कायम आहे. बेस्टची आर्थिक पत कमी झाल्यामुळे बँकांतून नवीन कर्ज मिळण्याचा मार्गही जवळपास बंद झाल आहे. मे महिना संपत आला तरी एप्रिल महिन्याचे वेतन कामगारांच्या हातात पडण्याचे चिन्ह नाहीत. यामुळे बेस्ट उपक्रमातील 42 हजार कर्मचारी-अधिकारी हवालदिल झाले आहेत. वीज उपक्रमाच्या नफ्यातून बेस्टची गाडी रस्त्यावर धावत आहे. मात्र कर्जाचे डोंगर वर्षगणिक वाढतच आहे. त्यामुळे कामगारांचे दर महिन्याचे वेतन देण्यासाठीही बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. तरीही बेस्टने आतापर्यंत कर्ज काढून दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वेतन कामगारांच्या हातावर टेकवले आहेत. कर्जाचे डोंगर वाढतच असल्याने पगाराची तारीख 20वर पोहोचली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळेल याची शाश्वतीच राहिलेली नाही. त्यात सतत कर्ज घेऊन बेस्टची आर्थिक पत कमी झाल्याने बँकांकडूनही कर्ज मिळण्यात अडचणी येऊ ला गल्या आहेत. पालक संस्था असलेल्या महापालिकेने मदतीची तयारी दाखवली आहे. मात्र यासाठी आधी बेस्टला तुटीतून बाहेर काढण्याचा कृती आराखडा सादर करण्याची सूचना महापालिकेने केली. त्यानुसार बेस्टने अनेक बचतीचे मार्ग सुचवणारा आराखडा तयार केला. परंतु या आराखड्यावर काम करणारे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाल्याने हा विषय लांबणीवर पडला आहे. त्यामुळे महापालिकेकडून आर्थिक मदत लवकर मिळण्याची शक्यता नसल्याने एप्रिल महिन्याच्या वेतनाची तजवीज करण्याचे आव्हान बेस्ट प्रशासनासमोर आहे. * बेस्ट उपक्रमात ४२ हजार कामगार-अधिकारी आहेत. त्यांच्या वेतनापोटी दरमहा १२० कोटी रुपयांची तजवीज बेस्ट प्रशासनाला करावी लागते. * बेस्टची आर्थिक पत कमी झाल्याने बँक केवळ बेस्टच्या नावावर कर्ज देण्यास तयार नाही. यावेळेस कर्जाच्या बदल्यात बेस्टची मालमत्ता गहाण ठेवण्यास सांगण्यात येत असल्याचे सूत्रांकडून समजते. * कामगारांच्या वेतनाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली असून उद्याच हा प्रश्न सुटेल, असा विश्वास बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी व्यक्त केला आहे. * बचतीचा पहिला मार्ग म्हणून बेस्टने २७८ वातानुकूलित बसगाड्या बंद केल्या. तसेच बेस्टच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र या दरवाढीस विरोध असल्याने हा प्रस्ताव अडचणीत आहेत.