आली हौस...पाडला पाऊस! गावकऱ्यांनी धुळवडीसाठी चक्क JCB आणले अन् एकच कल्ला, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 20:36 IST2022-03-18T20:35:30+5:302022-03-18T20:36:29+5:30
राज्यासह देशभर आज एकमेकांवर रंग उडवून धुळवड साजरी केली गेली. पण राज्यातील पवनी तालुक्यातील येनोळा गावात चक्क तीन जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांवर रंगाची उधळण करण्यात आली.

आली हौस...पाडला पाऊस! गावकऱ्यांनी धुळवडीसाठी चक्क JCB आणले अन् एकच कल्ला, पाहा VIDEO
भंडारा :
राज्यासह देशभर आज एकमेकांवर रंग उडवून धुळवड साजरी केली गेली. पण राज्यातील पवनी तालुक्यातील येनोळा गावात चक्क तीन जेसीबीच्या साहाय्याने गावकऱ्यांवर रंगाची उधळण करण्यात आली. अनोख्या होळी उत्सवाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. म्हणतात ना हौसेला मोल नसते, याचाच प्रत्यय येनोळा येथे शुक्रवारी आला आहे.
हौसेला मोल नाही! गावकऱ्यांनी धुळवडीसाठी चक्क JCB आणले अन् एकच कल्ला, भंडारा येथील येनोळा गावातील प्रकार pic.twitter.com/SAvfGNyIlY
— Lokmat (@lokmat) March 18, 2022
येनोळा गावातील गावकऱ्यांनी चक्क तीन जेसीबी आणले आणि त्यात रंगाचं पाणी भरलं. त्यानंतर या जेसीबीच्या सहय्यानं गावकऱ्यांवर रंग आणि पाण्याचा वर्षाव करण्यात आला. या अनोख्या धुळवडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर येनोळा गावकऱ्यांची संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे.