"विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद?"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 04:47 PM2024-02-21T16:47:30+5:302024-02-21T16:50:28+5:30

गेल्या काही दिवसांत पुण्यात विविध प्रकारचे गुन्हे घडल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र सरकारला सवाल केला.

Vijay Wadettiwar slams Eknath Shinde govt for increasing crimes in Pune and whole state | "विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद?"

"विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला ड्रग्जचा विळखा; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद?"

Vijay Wadettiwar Crime in Pune: राज्यात गेल्या १५ दिवसांत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्याचे दिसून आले. त्यातील बरेच गुन्हे हे पुणे आणि आसपासच्या परिसरातील आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज सापडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला आहे. महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा सुळसुळाट वाढला असून सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे?, असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातून जवळपास 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये कारवाई केली. पण पुण्यातील ड्रग्जची व्यप्ती आणखी मोठी असल्याचे बोलले जात आहे. तरीही सरकार ड्रगच्या समूळ उच्चाटनासाठी धडक कारवाई करत नाही. सरकार डोळेझाक करत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

राज्यातील तरुणाईला वाचविण्यासाठी ड्रग माफियांचा सरकारने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने धडक कारवाई करून जरब बसविली पाहिजे. अन्यथा हे ड्रग माफिया तरुणाईला देशोधडीला लावतील. सरकारने याकडे डोळेझाक करू नये. ज्यांच्या आशीर्वादाने ड्रग रॅकेट सुरु आहे त्यांच्या देखील मुस्क्या सरकारने आवळल्या पाहिजेत. सरकारने ड्रग प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

Web Title: Vijay Wadettiwar slams Eknath Shinde govt for increasing crimes in Pune and whole state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.