शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

विजय संचेती ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 5:52 AM

२५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या : ८०० किलोमीटरची ही यात्रा केली पायी

रायपूर : नियम-संयमाचे पालन करीत गेल्या २५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या करणारे तपस्वी विजय संचेती यांना अलिकडेच कैवल्यधाम तीर्थमध्ये साधू-साध्वींच्या सान्निध्यात ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले.

संचेतींनी आपल्या विशेष तपस्येच्या मालिकेत तीनवेळा उपधान तप केले आहे. श्री शत्रुंजय सिद्ध गिरिराज तीर्थ पालितानाची दोनवेळा नव्वाणु यात्रा केलेली आहे. त्यांनी ही यात्रा एकासना (दिवसभरात फक्त एकदा सात्विक आहार) आणि चौविहार छटसह पूर्ण केली. याशिवाय त्यांनी रायपूरहून श्री सम्मेद शिखरजी तीर्थ, मधुबनची पायी यात्रा केली. ८०० किलोमीटरची ही यात्रा त्यांनी ५० दिवसांत एकासना-आयंबिल-उपवासाने पूर्ण केली.त्यांनी नवपदजीची ओली साडेचार वर्षांत पूर्ण केली. संचेती यांनी साधू-साध्वी यांच्या एक हजार किलोमीटरपर्यंतच्या दीर्घ विहारात त्यांच्यासोबत वास्तव केले आहे.

आचार्य जिन पीयूष सागर सुरीश्वर म.सा., सम्यकरत्न सागर म.सा., महेन्द्र सागर म.सा.,साध्वी शुभंकराश्रीजी म.सा., राजेश श्रीजी म.सा., विधुत प्रभाजी म.सा. आदी ठाणाच्या सान्निध्यात अक्षयतृतीया तप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात जवळपास ८० तपस्वींना सन्मानित केले गेले. सम्यकसागर म.सा. यांनी तपस्वींची प्रशंसा केली. श्री कैवल्यधामतीर्थचे पदाधिकारी सुपारस गोलछा, धरमचंद लुणिया, त्रिलोक बरडिया यांनी तपस्वी विजय संचेती यांचा हार, पगडी देऊन सन्मान केला. यावेळी ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या प्रतिनिधी सोनल शर्मा, राजेश शर्मा, अशोक पटवा, संजय, पूरब श्रेयांश, प्रणय, प्रशांत संचेती, किरण,रिता, अर्पणा संचेती, सुरेश बुरडसह श्री ऋषभ देव जैन मंदिर आणि दादावाडीचे विश्वस्त उपस्थित होते.‘मासक्षमण’ म्हणजे काय?जैन समाजात चातुर्मासदरम्यान ‘मासक्षमण’ची तपस्या अर्थात पूर्ण महिनाभर गरम पाण्याच्या आधारावर उपवास करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेचे पालन करताना गेल्या २५ वर्षांपासून संचेती ‘मासक्षमण’ तपस्या करीत आहेत.‘जैन तत्त्वज्ञानानुसर संयम धर्माच्या पालनाने मनुष्य आपल्या स्वच्छंद प्रवृत्तीला लगाम घालू शकतो. कारण आयुष्यभर आम्ही भलेही कोणत्याही वस्तूचा उपयोग किंवा उपभोग करणार नाही. परंतु, मनात नेहमी त्या वस्तूंबद्दल ओढ असणेही बंधनाचे कारण आहे आणि स्वत:ला नियम धर्माने परिसीमित करून आम्ही या बंधनातून मुक्ती मिळवू शकतो,’ असे विजय संचेती यांनी सांगितले.