विद्यापीठाच्या निवडणुका पुढील वर्षीच- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 04:57 AM2018-11-01T04:57:06+5:302018-11-01T06:53:22+5:30

राज्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षीच होणार असून त्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केली जाईल. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही माहिती दिली.

Vidyapeeth elections next year- Vinod Tawde | विद्यापीठाच्या निवडणुका पुढील वर्षीच- विनोद तावडे

विद्यापीठाच्या निवडणुका पुढील वर्षीच- विनोद तावडे

Next

मुंबई : राज्यातील महाविद्यालयांमधीलविद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढील वर्षीच होणार असून त्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण केली जाईल. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. 

राज्य शासनाने या निवडणुकांसंदर्भात मंगळवारी अधिसूचना जारी केली होती. मात्र, निवडणुका नेमक्या केव्हा होणार हे स्पष्ट केले नव्हते. तावडे म्हणाले की, विद्यार्थी संघ निवडणुकीचा कार्यक्रम ३१ जुलै २०१९ पूर्वी घोषित करण्यात येईल आणि १९ सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होईल. विद्यापीठ विभाग तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील. तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील. राजकीय हस्तक्षेप टाळून ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

गुणवत्तेचीही असेल अट
विद्यार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण असणे अनिवार्य असेल. तसेच, विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष व सचिव विविध प्राधिकरणांवर निवडून येतील, ज्यामध्ये विद्यार्थी परिषद, अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यार्थी विकास मंडळ, महाविद्यालय विकास मंडळ, क्रीडा व शारिरीक विकास मंडळ यासारख्या प्राधिकरणांवर प्रतिनिधित्व असणार आहे.

Web Title: Vidyapeeth elections next year- Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.