शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-उद्धवसेनेत दिलजमाई; महायुतीत एकमेकांविरुद्ध लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 07:57 IST

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत दिलजमाई झाली. मात्र, महायुतीत शिंदेसेनेने माघार घेतली तरी दोन मतदारसंघांत अजित पवार गटाचे उमेदवार भाजप आणि शिंदेसेनेसमोर उभे ठाकले आहेत. 

मुंबई - विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत दिलजमाई झाली. मात्र, महायुतीत शिंदेसेनेने माघार घेतली तरी दोन मतदारसंघांत अजित पवार गटाचे उमेदवार भाजप आणि शिंदेसेनेसमोर उभे ठाकले आहेत. 

महायुती असतानाही विधान परिषद निवडणूक लढविणे हा रणनीतीचा भाग आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेनंतर शिक्षक मतदारसंघात आमचा उमेदवार कायम ठेवल्याचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबई पदवीधरसाठी शिंदेसेनेने दीपक सावंत यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या आग्रहामुळे शिंदेसेनेला माघार घ्यावी लागली. कोकण पदवीधरमध्येही भाजपचे निरंजन डावखरे यांच्यासाठी शिंदेसेनेच्या संजय मोरे यांनी माघार घेतली. अजित पवार गटाने मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे शिवाजीराव नलावडे व महेंद्र भावसार यांची उमेदवारी कायम ठेवली.   

ठाकरेंनी घेतला उमेदवार मागे- नाशिक शिक्षक व कोकण पदवीधरमधून उमेदवार मागे घेण्याची मागणी काँग्रेसनेउद्धव ठाकरेंकडे केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यासाठी फोन केला, मात्र तो ठाकरेंनी न उचलल्याची तक्रार होती. - अखेरच्या दिवशी ठाकरेंकडून कोकण पदवीधरचे किशाेर जैन यांनी, तर शरद पवार गटाच्या अमित सरैयांनी उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसनेही नाशिक पदवीधरमधून दिलीप पाटील व मुंबई शिक्षकमधून प्रकाश सोनवणेंची उमेदवारी मागे घेतली.  

अशा होणार प्रमुख लढतीमुंबई पदवीधर : ॲड. अनिल परब (उद्धवसेना), किरण शेलार (भाजप)मुंबई शिक्षक : शिवाजी नलावडे (अजित पवार गट), ज. मो. अभ्यंकर (उद्धवसेना), शिवनाथ दराडे (भाजप), सुभाष मोरे (समाजवादी गणराज्य पक्ष)  कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप), रमेश कीर (काँग्रेस)  नाशिक शिक्षक : संदीप गुळवे (उद्धवसेना), किशोर दराडे (शिंदेसेना), महेंद्र भावसार (अजित पवार गट)

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस