शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट, मनसेची माघार, अभिजित पानसे भरणार नाहीत उमेदवारी अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 09:20 IST

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात (Konkan Graduate Constituency) अभिजित पानसेंना (Abhijit Panse) उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने (MNS) निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजित पानसेंना उमेदवारी देऊन प्रचारालाही सुरुवात करणाऱ्या मनसेने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघामधून अभिजित पानसे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. 

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेनेभाजपा आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर मनसेने विधान परिषद निवडणुकीत महायुतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या निरंजन डावखरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. मात्र भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून माघार घ्यावी, राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, मनसेने विधान परिषदेची निवडणूक लढवू नये, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या विनंतीला मान देत राज ठाकरे यांनी मनसेचा उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपाचे विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, या निवडणुकीत मनसेने माघार घेतली  असली तरं असं नेहमी होणार नाही, असे संकेतही नितीन सरदेसाई यांनी दिले आहेत. 

दरम्यान, अभिजित पानसे यांच्या माघारीनंतर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे,  शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे आणि काँग्रेसचे रमेश कीर हे रिंगणार आहेत.      

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकMNSमनसेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र