शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

Video: धनंजय मुंडेंसाठी परळी मतदारसंघ सोडणार का? पंकजा मुंडे थेट बोलल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 20:22 IST

लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर स्पष्ट मत मांडले.

मुंबई/परळी-  राजकीय वाटचालीसह पक्षात होणारी घालमेल आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल पक्षाला काय वाटतं, यासह विविध विषयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी परळी मतदारसंघात झालेला पराभव आणि भविष्यातील वाटचाल, यावरही स्पष्ट भूमिका मांडली. लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपाने गोपीनाथ मुंडेंसाठी पाहिजे तेवढ न केल्यानं खटकतं का? पंकजा मुंडेंची 'मन की बात'

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र होते. तसेच, अशी चर्चा होती की, भाजपचीही काही समीकरणे धनंजय मुंडे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळेच तुमचा पराभव झाला का? यावर पंकजा म्हणाल्या, असं म्हणता येणार नाही. विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे यांनी त्यांची ताकत वाढवली होती. आम्ही दोघे वेगळे लढलो असतो, तर आम्हाला हरवणे सोपी गोष्ट नसती. आमचे विचार वेगळे असले तरी, आमचे गुरू गोपीनाथ मुंडे आहेत.

यावेळी त्यांना विचारण्यात आले की, भविष्यात दोघे एकत्र आलेले दिसतील का? यावर त्या म्हणाल्या, आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षातून, वेगळ्या विचारधारेतून येतो, त्यामुळे आमच्या दोघांनाही एका बाजुला जाणे सोपे नाही. आता त्यांचा पक्ष आमच्याशी जोडला गेला आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरही काही आव्हाने असणार आहेत. जी मते त्यांना सहज मिळणारी होती, ती आता त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे आमच्या दोघांच्या पक्षातील नेते काय ठरवतील, ते आता सांगणे कठीण आहे. 

परळी मतदारसंघ सोडणार का? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी असा कुठलाही विचार करत नाही. तो मतदारसंघ माझ्यासाठी खुप भावनिक आहे. मुंडे साहेबांचा तो मतदारसंघ आहे. तिथूनच मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले, मुंडे साहेबांच्या काळात मी तिथे कामे केली आहेत. माझ्या कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा आहे. मी पराभूत झाले पण 95 हजार मते घेऊन पराभूत झाले. ह्या 95 हजार लोकांना मी वाऱ्यावर सोडू नाही शकत. 

"मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री"; पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यावेळी नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सोबत आले आहेत, त्यामुळे पुढील विधानसभेत भाजपने परळी मतदारसंघ धनंजय मुंडे यांना सोडल्यावर तुमचा पवित्रा काय असेल? या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, मला वाटत नाह की, भाजप माझ्याशी चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेईल. भाजपचा असा स्वभाव, संस्कृती नाही. असा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी चर्चा नक्की करतील. सध्या माझ्याशी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. परळीची जागा सोडायचा विषयच येत नाही. माझ्याशी किंवा धनंजयशी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे अशी चर्चा झाल्यानंतर पाहू, अशी स्पष्टोकी पंकजा यांनी दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसparli-acपरळीElectionनिवडणूक