ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 -वांद्रे बेहरामपाडा भागात शुक्रवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फुटली. यावेळी अचानक तयार झालेल्या पाण्यात प्रवाहात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. विघ्नेश डोईफोडे आणि प्रियंका डोईफोडे अशी या दोन लहान मुलांची नावे आहेत.
विघ्नेश अवघ्या 8 महिन्यांचा तर, प्रियंका नऊ वर्षांची होती. त्यांना तात्काळ नजीकच्या भाभा हॉस्पिटल आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघांना मृत घोषित केले अशी माहिती वांद्रे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांनी दिली.
आणखी वाचा
बेहरामपाडयात जलवाहिनीच्या जवळ झोपडपट्टी आहे. वांद्रे स्थानकाजवळ आज सकाळी पाईपलाईनच्या दुरुस्तीचा काम सुरु होतं. त्यावेळी दुसऱ्या पाईपलाईनवर दाब आल्यामुळे जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी यामध्ये वाया गेलचं पण जवळ असलेल्या झोपडयांमध्ये सुद्धा पाणी शिरलं. सध्या इथे जलवाहिनी दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
https://www.dailymotion.com/video/x84576g