शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:33 IST

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

मुंबई - मला एका गोष्टीचं समाधान आहे. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु मला सत्तेची चटक लागली नाही अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं मी बोललो नव्हतो. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी दुकानदारी बंद करून बसेन? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. 

सामना संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. उद्धव ठाकरेंची ही मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. उद्धव ठाकरे स्वत: सुरतला गेले असते तर..? फुटीर लोकांनी विनंती केली आम्हाला गद्दार म्हणू नका. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असता का? तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती? फुटीरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले? मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसतेय का? असे रोखठोक प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारले. 

हम दो एक कमरे मे बंद हो और चाबी खो जाये असा टोला उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या प्रश्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. माझ्या मनात काही पाप नव्हतं. मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो परंतु सत्तेची चटक लागली नाही या एका गोष्टीचं माझ्या मनात समाधान आहे. मी मुख्यमंत्री होईन असं बोललो नव्हतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या बहुचर्चित मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या 'जोरदार' मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत. पहिल्या टिझरनंतर आता दुसरा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात उद्धव ठाकरेंनी बेधडक सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

पहिल्या टिझरमध्ये काय होतं?मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे. यात अखेरीस उद्धव ठाकरे यांनी "आता पुन्हा एकदा सामान्यांना सामान्यातून असामान्य लोक घडविण्याची वेळ आली आहे", असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता शुन्यातून सुरुवात करण्याची आणि सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाण्याची तयारी सुरू केली असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा