Video - "...तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही"; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 12:45 IST2022-10-03T12:43:30+5:302022-10-03T12:45:47+5:30

Shivsena Uddhav Thackeray And Dasara Melava : ठाकरे गटाने निष्ठेचा महासागर उसळणार असे म्हणत शिवसैनिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Video Shivsena Uddhav Thackeray dasara melava shivaji park teaser release | Video - "...तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही"; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर

Video - "...तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही"; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर

मुंबई - यंदा दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

"छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही" असं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. शिवसेनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एक नेता, एक झेंडा, एक मैदान... एकनिष्ठ शिवसैनिकांचा.. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

शिवसेनेने याआधी देखील टीझर लाँच केला आहे. ठाकरे गटाने निष्ठेचा महासागर उसळणार असे म्हणत शिवसैनिकांना मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे.

एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, शिवाजी पार्क दादर येथे, असे ट्विट शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही हा टिझर शेअर करत शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. वाजत गाजत, गुलाल उधळत या... पण शिस्तीत या!, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Video Shivsena Uddhav Thackeray dasara melava shivaji park teaser release