शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Video: शिवसेनेचे खासदार भर बैठकीत मास्क काढून शिंकले; नितेश राणेंनी शद्बांत 'चोपले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 17:49 IST

Nitash Rane targets MP Vinayak Raut : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे आमदार पूत्र नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात नेहमीच 'बाण' सुटत असतात. नितेश राणे नेहमी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर टीका करतात, तर शिवसेनेचे नेते त्यांना प्रत्यूत्तर देत असतात. मध्यंतरीच्या कोरोना काळात कोकणातील परंतू  मुंबईत राहणाऱ्या लोकांवरूनही राजकारण रंगले होते. आता पुन्हा कोरोनावरून टोलेबाजी रंगली आहे. निमित्त ठरले ते म्हणजे रत्नागिरी-सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत. 

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत देखील होते. महत्वाचे म्हणजे दोघांनीही मास्क घातले होते. सत्तार बोलत असताना बाजुला बसलेल्या विनायक राऊतांना शिंक आली. तोंडा, नाकावाटे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिक मास्क घालतात. मात्र, राऊत यांनी शिंक येताच नेहमीच्या सवयीप्रमाणे हात समोर धरला. यावेळी त्यांनी एकच चूक केली, शिंक येताना त्यांना मास्क काढला आणि नाका-तोंडासमोर हात धरला व पुन्हा मास्क घातला. नेमका हाच व्हिडीओ आमदार नितेश राणे यांनी पोस्ट करत निशाना साधला आहे. 

'' हे रत्नागिरी सिंधुदूर्गचे खासदार! एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे? अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानेच वाचवावे'' असा सणसणीत टोला लगावला आहे. 

दरम्यान, महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काल संध्याकाळी उशिरा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह वेंगुर्ले रेडी बंदराची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र रेडी पोर्ट कंपनीचे अधिकारी वगळता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अब्दुल सत्तार संतापले होते. 

घरबांधणीचे अधिकार पुन्हा ग्राम पंचायतींनाघरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात यासंबंधी घोषणा केली होती. फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेऊन टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. लोकप्रतिनिधींनीही या निर्णयाला विरोध केला होता. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेऊन फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द केला. आता घर बांधणी परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Vinayak Rautविनायक राऊत BJPभाजपाAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग