Video: खा.अमोल कोल्हेंनी लग्नात धरला ठेका; हलगीच्या तालावर केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 17:47 IST2022-04-17T17:46:57+5:302022-04-17T17:47:49+5:30
२ दिवसांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाचं लग्न नारायणगाव इथं पार पडले.

Video: खा.अमोल कोल्हेंनी लग्नात धरला ठेका; हलगीच्या तालावर केला भन्नाट डान्स
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. कोल्हे हे खासदार होण्यापूर्वी अभिनेते आहेत. आजही ते अभिनय क्षेत्रात काम करतात. परंतु तसेच असले तरी मतदारसंघातील लोकांसोबत त्यांचा संपर्क आहे. सध्या अमोल कोल्हे यांचा लग्नातील वरातीत केलेला भन्नाट डान्स सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
२ दिवसांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाचं लग्न नारायणगाव इथं पार पडले. या लग्नात नवरदेवासह अमोल कोल्हे यांनी ठेका धरला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर अमोल कोल्हे यांनी ताशा, हलगी आणि पिपाणीच्या नादावर चांगलाच ठेका धरला. त्याचा हा डान्स सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याआधी अमोल कोल्हे यांचा बैलगाडीपुढे घोडीवर मांड मारलेला व्हिडीओ किंवा टायरसोबत केलेल्या वर्क आऊटचा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता.
लग्नाच्या वरातीत डॉ. अमोल कोल्हेंनी धरला ठेका #AmolKolhepic.twitter.com/kEP3lDOhbp
— Lokmat (@lokmat) April 17, 2022
...लेकिन मै थकेगा नही साला
याआधीही अमोल कोल्हेंनी व्यायाम करताना व्हिडीओ पोस्ट केला होता त्यात म्हटलं होतं की, लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हता की टायर असा घाम काढेल'' अस ते म्हणाले आहेत. तर यहा टायर तो फायर निकला.... लेकिन मै थकेगा नही साला असा विश्वासही त्यांनी व्यायाम करताना व्यक्त केला आहे.