VIDEO : खासदार उदयनराजे भोसलेंनी पुन्हा उडवली कॉलर; कार्यकर्त्यांसोबत थिरकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 00:06 IST2021-12-22T00:03:51+5:302021-12-22T00:06:09+5:30
मंगळवारी रात्री विकासकामांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उदयनराजेंनी ही स्टाईल केल्याने कार्यकर्त्यांनी शिट्ट्या फुंकल्या. तसेच कार्यकर्त्यांसोबत उदयनराजे नाद नाय करायचा..., या गाण्यावरही थिरकले.

VIDEO : खासदार उदयनराजे भोसलेंनी पुन्हा उडवली कॉलर; कार्यकर्त्यांसोबत थिरकले
सातारा - शहरातील वॉर्डामध्ये विकासकामांच्या निमित्ताने खासदारउदयनराजे भोसले यांचा जोरदार राबता सुरू आहे. मंगळवारी एका वॉर्डामध्ये नाद नाही राजेंचा करायचा..., हे गाणे लावण्यात आले. यावेळी उदयनराजेंनी आपली कॉलर उडवत कार्यकर्त्यांसोबत डान्स केला.
उदयनराजेंची कॉलर उडविण्याची स्टाईल सगळ्यांनाच माहीत आहे. जाहीर कार्यक्रमांमध्ये आणि भर सभेत कॉलर उडवून विरोधकांना आव्हान देणारे उदयनराजे आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहे. मात्र, मंगळवारी रात्री विकासकामांच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी उदयनराजेंनी ही स्टाईल केल्याने कार्यकर्त्यांनी शिट्ट्या फुंकल्या. तसेच कार्यकर्त्यांसोबत उदयनराजे नाद नाय करायचा..., या गाण्यावरही थिरकले.
खासदारउदयनराजे भोसलेंनी पुन्हा उडवली कॉलर; कार्यकर्त्यांसोबत केला डान्स#UdayanRajeBhosale#UdayanRajeBhosaleDancepic.twitter.com/62tvT7b1Oo
— Lokmat (@lokmat) December 21, 2021