शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video: मंत्री महोदयांची 'दादा'गिरी; पोलिसांसमोर शिवीगाळ अन् श्रीमुखात लगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या दादागिरीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नाशिक: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे एका तरुणाला चापट मारताना आणि शिव्या देताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल उपस्थित केले आहे. भुसेंवर कारवाई करण्याचा संदर्भ देत आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ''मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर  बसवलत, #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक, आता बोला..'' असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. ही कथा ऐकण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीमध्ये काही चोरट्यांनी पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला, पण दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले. यातील एकाला दादा भुसे यांनी आधीच्या दिवशीच पोलीसांच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

तोच चोर बस स्थानक परिसरात आढळून आल्याने दादा भुसे तिथे पोहचले होते. यावेळी आक्रमक झालेल्या दादा भुसे यांनी थेट दोघा तरुणांचे फोटो काढा म्हणत शिवीगाळ केली, त्यात एकच्या श्रीमुखातही भडकवली. यावेळी बाजूलाच पोलिसही उपस्थित होते. पोलिसांसमोर दादा भुसे यांनी त्या व्यक्तीला मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दादा भुसे यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेNashikनाशिकPoliceपोलिस