VIDEO : ‘जलदूत’ला अखेरचा निरोप
By Admin | Updated: August 8, 2016 18:14 IST2016-08-08T18:11:59+5:302016-08-08T18:14:38+5:30
मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणा-या जलदूत एक्स्प्रेसला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. गेले चार महिने धावणा-या ‘जलदूत’ला सायंकाळी पाच वाजता

VIDEO : ‘जलदूत’ला अखेरचा निरोप
ऑनलाइन लोकमत
मिरज, दि. 08 - मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणा-या जलदूत एक्स्प्रेसला सोमवारी अखेरचा निरोप देण्यात आला. गेले चार महिने धावणा-या ‘जलदूत’ला सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
लातूर येथे तीव्र पाणी टंचाईमुळे मिरजेतून रेल्वेला लातूरला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ११ एप्रिलपासून ५० टँकरच्या साहाय्याने दररोज २५ लाख लिटरचा पाणीपुरवठा करण्यात आला. मिरजेतून रेल्वेच्या पाणी योजनेतून दररोज ५० रेल्वे टँकर घेऊन जाणा-या जलदूत एक्स्प्रेसने ११० फेºयांत सुमारे २६ कोटी लिटर पाणी लातूरला पोहोचवले आहे. पावसाळ्यातही लातूरला पाणी टंचाई असल्याने जलदूत एक्स्प्रेसला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र गेले आठवडाभर लातूर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने जलदूत एक्स्प्रेसने होणारा पाणीपुरवठा सोमवारपासून बंद करण्यात आला. गेले चार महिने दररोज लातूरला जाणा-या जलदूत एक्स्प्रेसची शेवटची खेप सायंकाळी रवाना झाली.