Video: अकोल्याच्या कुरूम येथे मालगाडी रुळावरुन घसरली

By Admin | Updated: July 11, 2017 16:41 IST2017-07-11T16:41:20+5:302017-07-11T16:41:20+5:30

ऑनलाइन लोकमत कुरुम (अकोला), दि. 11 - मूर्तिजापूर ते बडनेरा  गिट्टी वाहून नेणारी  मालगाडी ११ जुलै रोजी दुपारी कुरुम ...

Video: A cargo track was crushed at Kurum, Akola | Video: अकोल्याच्या कुरूम येथे मालगाडी रुळावरुन घसरली

Video: अकोल्याच्या कुरूम येथे मालगाडी रुळावरुन घसरली

ऑनलाइन लोकमत
कुरुम (अकोला), दि. 11 - मूर्तिजापूर ते बडनेरा  गिट्टी वाहून नेणारी  मालगाडी ११ जुलै रोजी दुपारी कुरुम रेल्वेस्टेशन रुळावरुन घसरली. या अपघातामुळे डाउन लाईनवरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या उशीराने धावत आहेत.गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे. 
 
रेल्वे टॅक दुरुस्त करण्यासाठी लागणारी गिट्टी घेउन ही मालगाडी मूर्तिजापूरवरून बडनेराकडे जात असताना कुरूम रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरली. या अपघातामुळे डाउन लाईनवरील वाहतुक प्रभावीत झाली आहे. परिणामी अहमदाबाद एक्स्प्रेस मूर्तिजापूर येथे थांबवण्यात आली आहे. त्यापाठोपाठ येणारी गितांजली एक्स्प्रेसलाही विलंब होणार आहे. मालगाडी रुळावरून काढण्यासाठी आणि वाहतुक सुरळीत होण्यासाठी दोन तास लागणार आहे. त्यामुळे, डाउन लाईनवरील गाड्या दोन तास उशीराने धावण्याची शक्यता आहे,दरम्यान, अप लाईन मात्र सुरू आहे, अशी माहिती अकोला येथील स्टेशन मास्टर जी.बी.मिना यांनी दिली.
पाहा व्हिडीओ-
 
 
https://www.dailymotion.com/video/x8457cq

Web Title: Video: A cargo track was crushed at Kurum, Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.