पुणे : सूर्य आग ओकत असल्याने विदर्भाची होणारी होरपळ आणखी दोन आठवडे तरी कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी वर्तविला आहे. उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणखी दोन आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे़ विदर्भाबरोबरच ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, तमिळनाडुतील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या १८ अथवा १९ मेपर्यंत मान्सून अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे़उष्माघाताचे दोन बळीयवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील उत्तरवार ले-आऊटमध्ये तुकाराम शंकर गेडाम या ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. गेडाम हे दुपारी बँकेच्या कामासाठी घरून पायी जात असतानाभोवळ येऊन पडले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनीत्यांना पाणी पाजले. परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात देवराव किसन लाटे (६२) या शेतकºयाचा मृत्यू झाला. कपाशीच्या शेतात मृतदेह आढळला.
विदर्भाची होरपळ आणखी १५ दिवस राहणार कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 01:21 IST