राजू शेट्टी यांचा विजय म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा विजय : योगेन्द्रसिंह यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 18:10 IST2019-03-28T16:50:18+5:302019-03-28T18:10:23+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाल्यास तो देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल, असे मत ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक आणि स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेन्द्रसिंह यादव यांनी गुरुवारी कोल्हापूरात व्यक्त केले.

राजू शेट्टी यांचा विजय म्हणजे देशातील शेतकऱ्यांचा विजय : योगेन्द्रसिंह यादव
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून विजयी झाल्यास तो देशातील शेतकऱ्यांचा विजय असेल, असे मत ज्येष्ठ निवडणूक विश्लेषक आणि स्वराज अभियान संघटनेचे संस्थापक योगेन्द्रसिंह यादव यांनी गुरुवारी कोल्हापूरात व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी अर्ज भरला. त्यांच्या प्रचारासाठी योगेंन्द्रसिंह यादव कोल्हापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यादव म्हणाले, राजू शेट्टी यांनी एनडीए सोडले. हे खूप मोठे धाडस होते. शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. लोकसभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधेयक मांडले. शेट्टी लोकसभेवर निवडून गेले तर तो केवळ त्यांच्या एकट्याचा किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय नसेल तर तो देशातील प्रत्येक शेतकऱ्यांचा विजय असेल, असेही यादव म्हणाले.