शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आजपासून कागदपत्रांची पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:42 IST

पुणे विभागीताल १०६ सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना अर्ज तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवेश प्रक्रियेला सुरूवात: डीटीईच्या सुविधा केंद्रात तपासणार कागदपत्र विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणारखुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क

पुणे: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरूवात झाली असून तंत्र शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सुविधा केंद्रात आज ( मंगळवारी दि. २५ )पासून सर्व कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांचा अर्ज निश्चित केला जाणार आहे. पुणे विभागीताल १०६ सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना अर्ज तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची दक्षता घ्यावी,अशा सुचना तंत्र शिक्षण विभागातर्फे संबंधित सुविधा केंद्रांच्या प्रमुख्यांना देण्यात आल्या आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.त्यानुसार 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणार आहे.तर येत्या २५ जून ते १ जुलै या कालावधीत कागदपत्रांची तपासणी करून प्रवेशासाठी अर्ज निश्चित करता येईल.खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.विद्यार्थी आपल्या घराजवळील कोणत्या सुविधा केंद्रात जाऊन कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश अर्ज निश्चित करू शकतात.पुणे शहरात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी),मॉर्डन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,शिवाजीनगर,जी.एच.रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज ,वाघोली,मराठवाडा मित्रमंडळाचे इंजिनिअरिंग कॉलेज,कर्वेनगर,सिंहगड  इंजिनिअरिंग कॉलेज,वडगाव,मराठवाडा मित्र मंडळ इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी,लोहगाव,पीआयसीटी-धनकवडी,भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज, कात्रज,झील एज्युकेशन सोसायटीचे इंजिनिअरिंग कॉलेज,न-हे आदी सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी करता येईल.विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मधून महाविद्यालयांचे पसंती क्रमांक भरता येईल.पहिला पसंतीक्रम टाकलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल.तसेच प्रवेशाबाबतची माहिती निश्चित करण्यासाठी अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर (एआयसी)अर्ज फ्लोट किंवा फ्रिज करता येईल.तसेच बेटरमेंटसाठी थांबता येईल.प्रवेशाबाबतच्या आवश्यक सूचना सीईटी-सेलतर्फे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.---------विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास स्वत:च्या लॉग इन आयडीमधील मेसेज बॉक्समधून तक्रार करता येईल.या तक्रारीची दखल घेवून संबंधित विद्याथ्यार्ची तांत्रिक अडचण दूर केली जाईल,असे डीटीईच्या अधिका-यांकडून कळविण्यात आले आहे.

प्रवेश शुल्क पुन्हा जमा होणारसीईटी-सेलतर्फे राबविण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया काही कारणास्तव रद्द करण्यात आली.मात्र,पहिल्या प्रवेश प्रकियेअंतर्गत दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाबरोबर शुल्कही जमा केले होते.या विद्यार्थ्यांचे शुल्क सीईटी सेलकडून पुन्हा संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुढील दोन आठवड्यात जमा केले जाणार आहे. सीईटी-सेलतर्फे संबंधित विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीcollectorजिल्हाधिकारी