शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

वाहनांची आता ई-पीयुसी : परिवहन विभागाला तात्काळ माहिती उपलब्ध होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 7:13 PM

सध्याचे वाहनांचे प्रदुषणाची चाचणी घेण्याची यंत्रणा बदलली जाणार असून त्याजागी ई-उपकरणे आणले जाणार आहे.

ठळक मुद्दे दर सहा महिन्याला पीयुसी घेणे आवश्यकपुणे आरटीओने आतापर्यंत ३८७ केंद्रांना दिली मान्यता देशपातळीवरील सर्व पीयुसी केंद्र एकाच प्रणाली अंतर्गत जोडली जाणार

- राजानंद मोरे -  पुणे : वाहनांना देण्यात येणाऱ्या पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (पीयुसी)ची प्रक्रिया आता संगणकीकृत होणार आहे. सध्याचे वाहनांचे प्रदुषणाची चाचणी घेण्याची यंत्रणा बदलली जाणार असून त्याजागी ई-उपकरणे आणले जाणार आहे. त्यामुळे वाहनाला पीयुसी दिल्यानंतर त्याची माहिती लगेच परिवहन विभागाला उपलब्ध होणार आहे. याअंतर्गत चाचणी घेतानाचे वाहनाचे छायाचित्र घेतले जाणार आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे प्रदुषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरांमधील वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये प्रदुषणाची पातळी अधिक असते. अनेक वाहनांमध्ये धुराचे लोट बाहेर पडत असतात. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे किंवा नाही, यासाठी प्रत्येक वाहनाला प्रदुषण चाचणी करणे बंधनकारक आहे. ही चाचणी केल्यानंतर पीयुसी दिले जाते. दर सहा महिन्याला पीयुसी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये कार्बन मोनोऑक्साइड व हायड्रोकार्बन या विषारी वायूंचे प्रमाण तपासले जाते. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पीयुसी केंद्रांना परवाने दिले जातात. पुणे आरटीओने आतापर्यंत ३८७ केंद्रांना मान्यता दिली आहे. मात्र, त्यापैकी २७८ केंद्रच सुरू आहेत. आता या केंद्रांचे रुपांतर ई-पीयुसी केंद्रांमध्ये केले जाणार आहे. देशपातळीवरील सर्व पीयुसी केंद्र एकाच प्रणाली अंतर्गत जोडली जाणार आहेत. त्यामुळे कुठेही पीयुसी काढले तरी त्याची माहिती एकाच प्रणालीमध्ये अपलोड होईल. यामध्ये पीयुसी चाचणीचे छायाचित्रही अपलोड केले जाईल. त्यामुळे वाहनाची खरेच चाचणी झाली आहे किंवा नाही हे लगेच समजणार आहे. परिवहन विभागाला संबंधित वाहनाचे पीयुसी लगेच पाहता येणार आहे. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सर्व पीयुसी केंद्रांना हे सॉफ्टवेअर व नवीन मशीन घ्यावी लागणार आहे. ----------- पीयुसीबाबत केंद्रचालकांसह वाहनचालकांनाही गांभीर्य नाही. चाचणीमध्ये अनेकदा अनियमितता दिसून येते. प्रत्यक्षात चाचणी न करता पीयुसी देणे, चुकीची नोंदणी करणे अशा बाबी आढळून येतो. संबंधित केंद्र चालकांची तक्रार असल्यासच आरटीओकडून तपासणी केली जाते. त्यांच्यावर फारसे नियंत्रण नसल्याने अनेक जण मनमानी करत असतात. किती वाहनांना पीयुसी दिले याबाबतची माहितीही आरटीओकडे उपलब्ध नाही. त्यामुळे वाहनचालक पीयुसी घेण्याकडे कानाडोळा करतात. नवीन प्रणालीमुळे वाहनांच्या पीयुसीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरRto officeआरटीओ ऑफीसdigitalडिजिटल