शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या खाताय... मग सावधान!

By admin | Updated: January 2, 2017 03:59 IST

बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्या खाताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बहुतांश स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या गटार

प्राची सोनवणे, नवी मुंबई बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्या खाताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील बहुतांश स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या गटार, नाल्यातील सांडपाण्यावर पिकविल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सांडपाण्यातील रासायनिक घटकांमुळे या भाज्या आरोग्याला हानिकारक असून त्यामुळे पोटाचे विकार, कॅन्सर, डायबेटीज आदी गंभीर आजार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतातून थेट बाजारात दाखल होणाऱ्या भाज्या कृषी विद्यापीठाकडून कीटकनाशक तसेच खतांचा वापर प्रमाणित करण्यात आला आहे. त्यानुसार नागरी आरोग्याचा विचार करून ठरवून दिलेल्या प्रमाणातच कीटकनाशके आणि खतांचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. मात्र रुळालगत पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांना कसलेच प्रमाण नसल्याने सर्रासपणे कीटकनाशकांचा तसेच रासायनिक खतांचा वापर केला जातो. शुध्द पाणी उपलब्ध नसल्याने रुळालगतच्या गटारातील अथवा नाल्यातील पाण्याचा वापर केला जातो. या भाज्यांच्या नमुन्यांची तपासणी न करताच ग्राहकांपर्यंत पोहोचविल्या जातात. घातक रसायनांचा वापर केलेल्या या भाज्या खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतात. बेलापूर ते चेंबूर रेल्वेस्थानकांदरम्यान छोटे वाफे करून या पालेभाज्या पिकवण्यात येतात. यात पालक, चवळी, भेंडी, लाल माठ, माठ आदी भाज्यांचा समावेश आहे. मात्र, या पालेभाज्या पिकविण्यासाठी रेल्वे रु ळांलगत असलेल्या गटारातील सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सांडपाण्यामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे या भाज्यांचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे आहारतज्ज्ञांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. या भाज्यांमुळे पोटाचे व शरीरावर दूरगामी परिणाम करणारे गंभीर आजार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. या भाज्या रेल्वेच्याच हद्दीतील जमिनींवर पिकविण्यात येत असून त्याबदल्यात रेल्वे प्रशासन संबंधितांकडून भाडे आकारते. असे असतानाही रेल्वेकडून या प्रकाराकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.महापालिकेचे तोंडावर बोटरेल्वे मार्गावर पिकणाऱ्या पालेभाज्यांची शहरात सर्रासपणे विक्री केली जाते. या पालेभाज्या दूषित पाण्यात पिकत असल्याने नागरी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. असे असले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र याप्रकरणी तोंडावर बोट ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अंगुलिनिर्देश केला आहे. यावरुन महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत किती जागरुक आहे हे स्पष्ट होते. रेल्वेच्या ‘ग्रो मोर फूड’ योजनेला हरताळरेल्वे हद्दीतील जागेवर अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २०१० साली ‘ग्रो मोर फूड’ या योजनेची सुरु वात केली. या योजनेंतर्गत रेल्वेची ८,८५९.१८ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१० पूर्वी एकरनिहाय १ हजार २५० रुपये मोजावे लागत होते. मात्र २०१० नंतर किमतीत वाढ झाली असून प्रतिएकर ४ हजार ०४७ रुपये दरवर्षी आकारले जातात. तसेच रेल्वे रूळालगतच्या जागेवर भाज्या पिकविणाऱ्यांकडून रेल्वे काही ठराविक भाडे आकारते. त्यामुळे या ठिकाणी पिकणाऱ्या भाज्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुध्दा रेल्वेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.