महाराष्ट्राच्या वीरपुत्राला आसाममध्ये वीरमरण, इंदापूरचे लक्ष्मण डोईफोडे शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 20:46 IST2021-02-24T20:45:09+5:302021-02-24T20:46:07+5:30
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील लक्ष्मण सतू डोईफोडे ( वय ४५) यांना आसाम राज्यात कर्तव्यावर असताना मंगळवारी(दि २३ )वीरमरण प्राप्त झाले.

महाराष्ट्राच्या वीरपुत्राला आसाममध्ये वीरमरण, इंदापूरचे लक्ष्मण डोईफोडे शहीद
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील लक्ष्मण सतू डोईफोडे ( वय ४५) यांना आसाम राज्यात कर्तव्यावर असताना मंगळवारी(दि २३ )वीरमरण प्राप्त झाले.
सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी सुभेदार म्हणून आपल्या पदावर कार्यरत होते. गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली. यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
वीरमरण आलेले लक्ष्मण डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. डोईफोडे परिवारावर दु:खाचा डोंगर पसरला आहे .बोराटवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी (दि.२६) सकाळी ८ वाजता लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव बोराटवाडी येथे आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर सकाळी ९ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.