शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएनं विशेष न्यायालयाला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली. 

मुंबई: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे तपासाला सहकार्य करत नाही. त्यामुळे पुढील तपास करू शकत नाही, अशी माहिती एनआयएने विशेष न्यायालयाला शुक्रवारी दिली. (Vaze does not cooperate the investigation NIA informed the special court)प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली. शुक्रवारच्या सुनावणीत एनआयएने विशेष न्यायालयाला सांगितले की, वाझेची चौकशी सुरू असताना त्याच्या वकिलांना ते दिसतील अशा अंतरावर उभे राहण्याची परवानगी दिली आहे. वाझेच्या वकिलांना चौकशीत काय प्रश्न विचारण्यात येत आहेत आणि काय उत्तरे दिली, हे ऐकण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना काही दूर अंतरावर उभे राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण तरीही वाझेचे वकील उपस्थित राहत नाहीत.  तर दुसरीकडे वाझेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, एक वकील एनआयए कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये एक रात्र राहिला. सचिन वाझेची चौकशी सुरू करण्यात आली की बोलवावे, असे सांगूनही एनआयए अधिकाऱ्यांनी त्यांना बोलावले नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळला. या अर्जाद्वारे एनआयएने न्यायालयाला विनंती केली होती की, सचिन वाझेच्या वकिलांना चौकशीदरम्यान उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत. जेणेकरून वाझे सहकार्य करतील, तर दुसरीकडे न्यायालयाने वाझेचा अर्ज फेटाळला. तपासादरम्यान वकिलांशी संवाद साधण्याची मुभा वाझेने मागितली होती.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी