शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’ देणार २५ मुस्लिमांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 14:05 IST

काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते...

ठळक मुद्देवरिष्ठ सूत्रांची माहिती : काँग्रेससोबतच्या आघाडीबाबतही लवकरच निर्णयाची शक्यता  वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरूजलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

धनाजी कांबळे - पुणे : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत तब्बल ४१ लाख मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता हीच वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीत लहान जातींमधील समूहांना प्रतिनिधित्व देणार असून, सुमारे २५ मुस्लिमांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मात्र, हे मतदारसंघ कोणते असतील याबाबत मात्र गुप्तता राखण्यात येत आहे. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. मात्र,  लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी एक पत्रक प्रसिद्धीला देऊन एमआयएमची वंचित सोबतची आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले असताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून मात्र तसा कोणताही संदेश किंवा पत्र ‘वंचित’च्या वर्किंग कमिटीकडे किंवा वंचितचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत असदुद्दीन ओवेसी यांनी पुढाकार घेऊन चर्चा सुरू केली होती. त्यामुळे युती कायम ठेवायची, किंवा तोडायची याचा निर्णयदेखील तेच घेतील. त्यामुळे त्यांचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अजूनही एमआयएम आमच्यासोबतच आहे, असे पत्र वंचितच्या वर्किंग कमिटीने प्रसिद्धीस दिले आहे. जलील यांनी काढलेल्या पत्रकाच्या संदर्भाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी घडत असताना वंचितच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत मुस्लिम, ओबीसी, धनगर, गरीब मराठा, आदिवासी अशा लहान समाज घटकांना स्थान देण्यात आले आहे. त्याची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असून, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने जातीच्या उल्लेखासह उमेदवार जाहीर केले होते. तोच फॉर्म्युला यावेळी देखील कायम ठेवण्यात आला असून, आतापर्यंत ज्यांना कोणत्याच राजकीय पक्षाने संधी दिली नाही, अशा वंचित घटकांना निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रतिनिधित्व देण्यावर भर असल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत युती करण्याच्या चर्चा होत असताना एमआयएम असेल, तर आघाडी होणे शक्य नाही, असे म्हटले जात होते. मात्र, आता जलील यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार एमआयएम बाहेर पडली असेल, तर काँग्रेस आघाडी पुन्हा वंचितसोबत चर्चा करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस आघाडीत सामील होते का नाही, याबद्दलही उत्सुकता आहे. .......जलील यांचा बोलवता धनी कोण?

लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना भरघोस मते मिळाली, यात वंचितचादेखील महत्त्वपूर्ण वाटा आहे. मात्र, खासदार म्हणून निवडून आल्यापासून जलील यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत, त्यामुळेच ते एकतर्फी निर्णय जाहीर करीत आहेत, अशी चर्चा आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना विचारून त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे, का स्वत:च निर्णय घेतला आहे, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे जलील यांचा बोलावता धनी कोण? एमआयएम वंचितपासून वेगळी होण्याने कुणाचा फायदा होणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे......... 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर